Wednesday, July 15, 2026
Homeनागपूरनोकरीवर असल्याची बतावणी; सहा लाखाचे कर्ज उचलले आणि ९५ हजार रुपये भरले.....

नोकरीवर असल्याची बतावणी; सहा लाखाचे कर्ज उचलले आणि ९५ हजार रुपये भरले.. – हफ्ते थकताच झाला भांडाफोड; महिलेने बँकेला लावला चुना…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-आता फक्त पुरुष वर्गच नाही तर महिला वर्गही एकदम आगे बढवू लागल्या आहेत.असा कोणताच क्षेत्र सुटलेला नाही की महिला मंडळी मागे राहिलेल्या आहेत. त्यातच काही महिला अनेकांच्या चिट्टीवरून हात फिरविण्यातही माहिर झाल्याचे निदर्शनास येऊ लागले आहे.अश्याच प्रकारे एका ४२ वर्षीय महिलेने  शासकीय नोकरीवर असल्याची बतावणी करून बँकेला हुबेहुब कागदपत्रे सादर केली आणि तब्बल सहा लाख रुपयांचे कर्ज घेतले. अश्यातच बँकेला ९५ हजार रुपयांचे हफ्तेही भरले.मात्र,उर्वरित रकमेचे हफ्ते चुकवून पोबारा केल्याची घटना उघडकीस तक्रारीवरून संबंधित महिलेविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.माधुरी सुधीर ठाकरे वय ४२ वर्षे,रा.एकता नगर,बुटीबोरी असे आरोपी महिलेचे नाव असून तिने जुलै २०२३ मध्ये कोटक महिंद्रा बँकेकडून सहा लाख रुपयांचे वैयक्तिक कर्ज घेतले होते.कर्ज घेतांना तिने  हिंगण्यातील टाकळघाट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कनिष्ठ लिपीक पदावर कार्यरत असलेली कागदपत्रे बँकेला दिली होती.कर्ज मिळाल्यानंतर तिने ९५ हजार रुपये भरले होते.मात्र,त्यानंतर तिने हफ्ते भरणे बंद केले. त्यामुळे बँकेचे कलेक्शन मॅनेजर विवेक बाबलाजी भुडे वय ३३ वर्षे यांनी तिचे तपशील तपासले.त्यानुसार ते अगोदर तिच्या पत्त्यावर गेले.मात्र,तेथे ती आढळली नाही.त्यामुळे तिने दावा केल्याप्रमाणे तिच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहोचले.मात्र,तिथेही माधुरी ठाकरे नावाची कोणतीही लिपीक काम करत नसल्याचे त्यांना सांगण्यात आल्याने धक्काच बसला. त्यानुसार महिलेने बनावट कागदपत्रांच्या आधारे कर्ज उचलल्याचे स्पष्ट झाल्याने अखेर बँकेचे कलेक्शन मॅनेजर विवेक बाबलाजी भुडे यांच्या तक्रारीवरून माधुरी ठाकरेच्या विरोधात पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता राज्यभरातील धनादेश अनादराची प्रकरणे परस्पर सामंजस्याने निघणार निकाली..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या आदेशान्वये निगोशिएबल इन्स्ट्रुमेन्ट्स ॲक्ट,१८८१ च्या...

आजपासून संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम,१९५१ च्या कलम ३७ (१) व (३)अन्वये संपूर्ण गडचिरोली...

महत्त्वपूर्ण निर्णय..चंद्रपूर डाक विभागातून विभाजन होऊन आता गडचिरोली स्वतंत्र डाक विभाग..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत डाक विभागाने चंद्रपूर डाक विभागातून गडचिरोली डाक विभागाचे प्रशासकीय विभाजन करण्याची अधिकृत घोषणा केली आहे.या...

पदाचा दुरुपयोग; चार लाखाची झाडे विकली एक लाखात,सरपंच अपात्र..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काहीजण एखाद्या पदावर विराजमान झाले की,स्वतःला मोठे पदाधिकारी समजून मनमर्जीने निर्णय घेण्याचा सपाटा चालवतांना दिसून येतात.पण,आपल्या मागची पार्श्वभूमी काय होती आणि...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!