Monday, May 25, 2026
Homeगडचिरोलीनावांमध्ये व चुकीचे खात्यांमुळे जिल्ह्यातील हजारो शेतकरी मदतीपासून वंचित - शेतकऱ्यांना तातडीने मदत...

नावांमध्ये व चुकीचे खात्यांमुळे जिल्ह्यातील हजारो शेतकरी मदतीपासून वंचित – शेतकऱ्यांना तातडीने मदत करा- आमदार डॉ.देवराव होळी यांची विधासभेत मागणी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना व छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा झाली. नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्याबाबत निर्णय घेतला. परंतु नावांमध्ये व खात्यांच्या अंकामध्ये झालेल्या चुकामुळे अजूनही जिल्ह्यातील हजारो शेतकरी या मदतीपासून वंचित आहेत.या शेतकऱ्यांना शासन तातडीने मदत करणार का? असा प्रश्न आमदार डॉ. देवराव होळी यांनी लक्षवेधीतील चर्चेत सहभागी होऊन राज्याचे सहकारमंत्री अतुल सावे यांच्याकडे केला.

यासाठी अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्यात आली असून त्याबाबतचे निर्देश संबंधित विभागाला देण्यात आले आहेत.तसेच वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत दिली जाईल,असे आश्वासन सहकार मंत्री अतुल सावे यांनी सभागृहाला दिले. कर्जमाफी झाली त्यावेळेस देण्यात आलेल्या खात्याच्या नावात अंकात, बँकेकडून, प्रशासनाकडून चुका करण्यात आल्या.मात्र त्या चुकांची मोठी किंमत शेतकऱ्यांना चुकवावी लागत आहे.अजुनपर्यंत अनेक शेतकरी लाभापासून वंचित आहेत.त्यासाठी सरकारने गंभीर होऊन लक्ष देण्याची आवश्यकता आहे. लवकरात लवकर अशा चुका दुरुस्त करून शासनाने शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी,अशी मागणी आमदार डॉ.देवराव होळी यांनी शासनाला केली आहे.

गडचिरोली,चंद्रपूर जिल्ह्यामध्ये भटक्या जमातींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.ही जमात अत्यंत गरीब असून हलाखीचे जीवन जगत आहे.त्यांना राहण्यासाठी घर देखील नाही.त्यामुळे त्यांना घरकुल देण्यासंदर्भात शासन स्तरावर आलेला प्रस्ताव तातडीने मंजूर करणार का व त्यासाठी निधी उपलब्ध करून देणार का? असा प्रश्न आमदार डॉ.देवराव होळी यांनी राज्याचे इतर मागासवर्गीय मंत्री अतुल सावे यांच्याकडे लक्षवेधी प्रश्नांच्या चर्चेप्रसंगी केला. यावेळी मंत्री सावे यांनी यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात आलेला असून अर्थसंकल्पामध्ये त्यासाठी तरतूदही करण्यात आली असल्याची माहिती दिली. शासन स्तरावरील सर्व प्रस्ताव लवकरच मंजूर करून त्यांना योग्य पद्धतीने निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी उत्तरादरम्यान सभागृहाला दिले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर बदल्यांचे सुलतान तुकाराम मुंढेनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा स्वीकारला पदभार..

उद्रेक न्युज वृत्त मुंबई :-बदल्यांचे सुलतान म्हणवल्या जाणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी आज,सोमवार २५ मे रोजी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला.विशेष...

गडचिरोली जिल्ह्यात पुढील दोन दिवस उष्ण लहरींचा इशारा; आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-हवामान विभाग,प्रादेशिक केंद्र नागपूर यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार गडचिरोली जिल्ह्यात  काही ठिकाणी उष्ण लहर ते तीव्र उष्ण लहर निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात...

हृदय हेलावणारी घटना..! आधी चार मुलांना विहरीत ढकलले व नंतर वडिलाने स्वतःही केली आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  बुलढाणा :-जिल्ह्याच्या जळगाव जामोद तालुक्यात हृदय हेलावणारी घटना आज,सोमवार २५ मे रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आल्याने समाजमन सुन्न झाले आहे.सातपुडा पर्वत रांगांच्या...

बलात्कार पीडितेचे नाव सार्वजनिक करणे पडले महागात.. – गृह विभागाचे प्रधान सचिव,पोलिस आयुक्त तसेच पोलिस निरीक्षक यांना उत्तर सादर करण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बलात्कार पीडितेची किंवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील अल्पवयीन पीडित मुलीची ओळख म्हणजेच नाव किंवा छायाचित्र जाहीर करणे कायद्यानुसार गंभीर गुन्हा आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!