Monday, August 31, 2026
Homeगडचिरोलीनाट्यश्री कविता स्पर्धेतील सोळाव्या सत्रात पुरुषोत्तम ठाकरे विजयी…

नाट्यश्री कविता स्पर्धेतील सोळाव्या सत्रात पुरुषोत्तम ठाकरे विजयी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

 गडचिरोली :- स्थानिक ‘नाट्यश्री साहित्य कला मंच, गडचिरोली’ च्या वतीने “आठवड्यातील उत्कृष्ट कवी व कविता” हा नविन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे.त्यानुसार दर आठवड्याला ही स्पर्धा घेण्यात येते.सदर कवितेचे सोळावे सत्र नुकतेच पार पडले असून यात २६ कवींनी सहभाग नोंदविला होता. या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून त्यात गडचिरोली येथील कवी पुरुषोत्तम ठाकरे यांची आठवड्याचे उत्कृष्ट कवी व त्यांच्या “संवेदना” या कवितेची आठवड्याची उत्कृष्ट कविता म्हणून निवड करण्यात आली आहे.असे नाट्यश्रीचे संचालक व नाटककार चुडाराम बल्हारपुरे व कविता विभाग प्रमुख योगेश गोहणे यांनी कळविले आहे. 

पुरुषोत्तम ठाकरे हे गडचिरोली येथील रहिवासी असून ते राणी दुर्गावती विद्यालयात पर्यवेक्षक म्हणून काम करतात.ते नवोदित कवी असून ६० ते ७० कवितांचे लेखन त्यांनी केलेले आहे.नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘रानगर्भ फुलत आहे ‘ या प्रातिनिधिक कविता संग्रहात त्यांच्या दोन कविता प्रकाशित झालेल्या आहेत.विविध स्तरावरुन त्यांचा सत्कार झालेला आहे.ते सातत्याने कविता लेखनाचे  कार्य करीत आहे.  

 त्यांच्या या यशाबद्दल नाट्यश्री चे दादा चुधरी,दिलीप मेश्राम, प्रा.यादव गहाणे व प्रा.अरुण बुरे तसेच नाट्यश्री च्या सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

या सोळाव्या सत्राच्या स्पर्धेत प्रामुख्याने जयराम घोंगडे,वंदना सोरते,राज मुंजाळ,कु.तनुजा अशोक भोयर,गणेश रामदास निकम,रेखा दिक्षित,वामनदादा गेडाम,नरेंद्र गुंडेली,तुळशीराम उंदीरवाडे, प्रशांत गणवीर,संतोष कपाले,पुरुषोत्तम ठाकरे,सिध्दार्थ गोवर्धन,प्रेमिला अलोने,पुरुषोत्तम दहिकर,उपेंद्र रोहनकर,नागोराव सोनकुसरे,ज्योत्स्ना बन्सोड,डाॅ.मंदा पडवेकर,चरणदास वैरागडे,कु.सानिया जेंगठे, खुशाल म्हशाखेत्री,सुजाता अवचट,पुरुषोत्तम लेनगुरे, गजानन गेडाम,माधुरी अमृतकर इत्यादी कवींनी सहभाग नोंदविला होता.या पुरस्काराचे वितरण नाट्यश्रीच्या पुढील कार्यक्रमात करण्यात येणार आहे.

    -चुडाराम बल्हारपुरे (नाटककार)

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाघाच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील मोहर्ली वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मोहर्ली वनपरिक्षेत्राच्या मोहर्ली बिटातील १५४ कक्ष क्रमांकात...

ई-पीक पाहणी नोंद घेणाऱ्यांकडून पैश्याची मागणी; तहसील कार्यालयात करा तक्रार..

उद्रेक न्युज वृत्त :-शासनाने 'खरीप हंगाम-२०२६' साठी ई-पीक पाहणीच्या कार्यपद्धतीत बदल करून गावनिहाय नियुक्त करण्यात आलेल्या पीक पाहणी सहाय्यकांमार्फत पिकांची नोंद करण्यात येत आहे.विशेष म्हणजे,शासकीय योजना,पीक कर्ज...

पुष्पा स्टाईलने सागवान लाकूड तस्करीचा डाव.. – घेराबंदी घालताच तस्करांनी ठोकली धूम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला 'पुष्पा: द राईज' हा लोकप्रिय चित्रपट सर्वांच्याच लक्षात आहे.आंध्र प्रदेशच्या शेषाचलम जंगलातील लाल...

तब्बल बारा दिवसांपूर्वी आलेल्या धमकीच्या ‘ई-मेल’ ची धास्ती; उद्याला शाळांना सुट्टी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहरातील तब्बल डझनहून अधिक नामांकित शाळांसह १९ ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल मंगळवार १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!