Friday, September 4, 2026
Homeगडचिरोलीनाटककार तथा साहित्यिक चुडाराम बल्हारपुरे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित.. - 'महापूजा' या महानाट्यास...

नाटककार तथा साहित्यिक चुडाराम बल्हारपुरे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित.. – ‘महापूजा’ या महानाट्यास ‘उत्कृष्ट वाड्.मय पुरस्कार – २०२५’ प्रदान..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-अहिल्यानगर जिल्ह्याच्या नेवासा तालुक्यातील संतनगरी,कांगोणी येथील ‘श्री संत किसन महाराज सुडके ग्रामीण विकास प्रतिष्ठान’ च्या वतीने यंदा पहिल्यांदाच साहित्य स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती.या साहित्य स्पर्धेकरीता संपूर्ण महाराष्ट्रातून १५० साहित्यिक यांनी सहभाग नोंदविला.या स्पर्धेत एकूण ३० साहित्यिक यांना पुरस्कृत करण्यात आले असून त्यात नाट्य विभागात झाडीपट्टीतील प्रसिद्ध नाटककार तथा साहित्यिक चुडाराम बल्हारपुरे यांच्या ‘महापूजा अर्थात महासती सावित्री’ या महानाट्यास नाट्यलेखनाचे प्रथम पुरस्कार प्राप्त झाले असून त्यांना ‘श्री संत किसन महाराज जीवन गौरव पुरस्कार – २०२५’ ने सन्मानित करण्यात आले.
मंगळवार ७ ऑक्टोंबर २०२५ रोजी संतनगरी कांगोणी येथे श्री संत किसन महाराज सुडके यांचे पुण्यतिथीनिमित्त झालेल्या भव्यदिव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात कार्यक्रमाचे अध्यक्ष निलेश लंके(खासदार), आबासाहेब अभंग(आमदार),श्री संत गुरु बाळकृष्ण सुडके महाराज,यांचे हस्ते श्रीसंत गुरुदेव मुंडे, ह.भ.प.पोकळे महाराज,ह.भ.प.दिघे महाराज, ह.भ.प.लक्ष्मणरावजी पोंगे महाराज,सतीशजी थोरात, तुकाराजी थोरात (सभापती),जातीर गुरुजी,ह.भ.प.  कोकणी महाराज व प्रतिष्ठान मधील सर्व संतमंडळी यांच्या उपस्थितीत या वर्षातील दर्जेदार साहित्यिकांना सन्मानित करण्यात आले.त्यात झाडीपट्टीतील नाटककार तथा साहित्यिक चुडाराम बल्हारपुरे यांनाही त्यांच्या ‘महापूजा अर्थात महासती सावित्री’ या नाटकाचे लेखनासाठी ‘ श्री संत किसन सुडके महाराज उत्कृष्ट वाड्.मय व जीवनगौरव पुरस्कार -२०२५” या पुरस्काराने गौरविण्यात आले.या प्रसंगी संस्थेचे पदाधिकारी,विजेते साहित्यिक व गावकरी मंडळी बहुसंख्येने उपस्थित होते.
‘महापूजा’ हे संपूर्ण झाडीपट्टीत गाजलेले महानाट्य असून या महानाट्याचे १०० च्या वर प्रयोग झालेले आहेत. विशेष म्हणजे, ‘महापूजा’ नाटकास संत्रा नगरीनागपूर येथील ‘साहित्य विहार’ या संस्थेतर्फे मिळालेल्या राज्यस्तरीय उत्कृष्ट वांड्.मय पुरस्कारासह हा पाचवा राज्यस्तरीय पुरस्कार आहे.यामुळे संपूर्ण झाडीपट्टीची मान उंचावली आहे.
चुडाराम बल्हारपुरे यांच्या या यशाबद्दल पद्मश्री डॉ. परशुराम खुणे,प्रा.अरुण बुरे,योगेश गोहणे,प्रा.यादव गहाणे,प्रा.डॉ.श्याम मोहरकर,प्रा.डॉ.जनबंधू मेश्राम,प्रा. डॉ.योगीराज नगराळे,प्रा.डॉ.राजकुमार मुसणे,डॉ. दिपक चौधरी,रमेश निखारे,नाट्यश्रीचे दादा चुधरी, दिलीप मेश्राम,राजेंद्र जरुरकर,प्रा.नवनीत देशमुख(साहित्यिक), मधुश्री प्रकाशनचे प्रकाशक पराग लोणकर सह साहित्यिक व कलावंतांनी अभिनंदन केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मोहफुलाची दारू नाही; तर पौष्टिक लाडू,चिक्की व विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मोहफुलांचा अवैध मद्यनिर्मितीसाठी होणारा वापर रोखून त्यापासून पौष्टिक लाडू,चिक्की व विविध प्रक्रियायुक्त उत्पादने तयार करण्याची सक्षम मूल्यसाखळी जिल्ह्यात उभारावी.महिला बचत गटांना...

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!