Thursday, September 3, 2026
Homeगडचिरोलीनागरिकांनी विकसित महाराष्ट्र २०४७ सर्वेक्षणात सहभाग नोंदविण्याचे आवाहन..

नागरिकांनी विकसित महाराष्ट्र २०४७ सर्वेक्षणात सहभाग नोंदविण्याचे आवाहन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-भारत सरकारच्या ‘विकसित भारत २०४७’ या दूरदृष्टी कार्यक्रमाच्या अनुषंगाने महाराष्ट्र सरकारने विकसित महाराष्ट्र २०४७’ हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे.त्यामध्ये विकसित महाराष्ट्र २०४७ करिता व्हिजन डॉक्युमेन्ट तयार करण्यात येणार असून त्यासाठी नागरिकांनी https://wa.link/o93s9m या लिंक वर माहिती भरून आपला सहभाग नोंदविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी यांनी सर्व तालुक्यातील उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना या मोहिमेत नागरिकांना सहभागी करून घेण्याच्या सूचना दूरदृष्य प्रणाली द्वारे दिल्या.अप्पर जिल्हाधिकारी नितीन गावंडे,जिल्हा नियोजन अधिकारी श्रीराम पाचखेडे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
विकसित महाराष्ट्रासाठी व्हिजन डॉक्युमेन्ट तयार केला जात आहे,ज्यामध्ये कृषी व संलग्न क्षेत्र,उद्योग व सेवा,सामाजिक,आर्थिक,शैक्षणिक,प्रशासन व पर्यावरणीय इत्यादी क्षेत्रांच्या क्षेत्रनिहाय अभ्यास समित्या गठीत करण्यात आलेल्या आहेत.मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व विविध खात्यांचे मंत्री यांच्या नेतृत्वाखाली सर्व जिल्ह्यांमध्ये जनतेचा सहभाग घेऊन व्यापक चर्चासत्रे आयोजित केली जाणार आहेत. जनतेच्या सूचना,गरजा व अपेक्षा लक्षात घेऊन सदर व्हिजन डॉक्युमेन्ट तयार केले जाणार आहे.त्याकरिता सदर सर्वेक्षणात सर्वसामान्य जनतेचा सहभाग महत्वाचा असून सर्वेक्षणाची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यात येत आहे.याकरिता प्रत्येक गावातील ग्रामसेवक,आशा कार्यकर्त्या,अंगणवाडी सेविका, शाळा,महाविद्यालयांनी गावकरी,विद्यार्थ्यांना या सर्वेक्षणात सहभागी होऊन आपल्या सूचना मांडण्याचे आवाहन करावे,असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.नागरिक आपल्या सूचना  https://wa.link/o93s9m या लिंकद्वारे दाखल करू शकतात.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीराम गहाणे यांना आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर.. -उच्च शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील महाविद्यालयीन,विद्यापीठ, अभियांत्रिकी व कला शिक्षण क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या प्राचार्य व शिक्षकांचा यथोचित गौरव करण्याच्या उद्देशाने दरवर्षी “डॉ.जे.पी.नाईक आदर्श...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!