- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-बालविवाह करणे कायद्याने गुन्हा आहे.असे असतांनाही नागपूरच्या कामठी परिसरात वारंवार बालविवाह करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.अश्याच प्रकारे काल,बुधवार २५ जून रोजी नागपूरच्या कामठी परिसरात एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह सोहळा पार पडणार होता.नवरी सजली होती. पाहुण्यांची रेलचेल सुरू झाली.मंडपात सनई-चौघडा वाजू लागले.नवरी लग्न मंडपात जाणार,तितक्यात धाडकन बाल संरक्षण विभागाच्या पथकासह पोलिसांची एंट्री झाली.एंट्री होताच मंडपात सगळीकडे पळापळ सुरू झाली आणि बाल विवाह होता-होता बचावला.कामठी परिसरातील दोन महिन्यांतील चौथी घटना असल्याने समजावूनही काहीजण ऐकण्याच्या मनःस्थितीत नसल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढू लागली आहे. कामठी परिसरात बाल विवाह आयोजित करण्यात आला असल्याची माहिती कामठीचे पोलिस निरीक्षक महेश आंधळे यांना मिळाल्यानंतर,त्यांनी तातडीने जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुस्ताक पठाण यांच्याशी संपर्क साधला.त्यानंतर,महिला व बालविकास अधिकारी रणजीत कुरे यांनी कारवाईसाठी संरक्षण अधिकारी साधना हटवार, दीप्ती मोटघरे,रुक्मिणी जंगलवार आणि ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्टच्या वैष्णती बावणे यांचे पथक स्थापन केले.पथकाने लागलीच विवाहस्थळी धडक देत बालविवाह रोखला. बालविवाहाचे दुष्परिणाम तसेच मुलींना होणारा त्रास व इतर बाबी उपस्थितांना समजावून सांगत १७ वर्षीय मुलीला बालसुधारगृहात नेण्यात आले.
- Advertisement -

