Sunday, September 6, 2026
Homeगडचिरोलीनगरपरिषद क्षेत्रात वाहनांना वेगमर्यादा लागू करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना.. - रस्ते सुरक्षा समितीची...

नगरपरिषद क्षेत्रात वाहनांना वेगमर्यादा लागू करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना.. – रस्ते सुरक्षा समितीची बैठक संपन्न..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-नागरी वस्तीतून जाणाऱ्या वाहनांनी नियमांनुसार वेगमर्यादेत रहावे,यासाठी नगरपरिषद क्षेत्रात कमी वेगमर्यादा लागू करण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिल्या.जिल्ह्यातील विशेषत: २०१८ पूर्वीच्या जड वाहनांमध्ये बसविण्यात आलेल्या वेगमर्यादा चिप कार्यरत आहेत का,याची काटेकोर तपासणी करावी, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
रस्ते सुरक्षा समितीची बैठक आज,सोमवार ८ सप्टेंबर गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती.यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता निता ठाकरे,अप्पर पोलिस अधीक्षक एम.रमेश,उपप्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधुरी किलनाके,नगरपालिकेचे मुख्याधिकारी सुर्यकांत पिदुरकर,कार्यकारी अभियंता सुरेश साखरवडे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पंडा यांनी अपघातग्रस्तांना गोल्डन अवरमध्ये उपचार मिळणे अत्यावश्यक असल्याचे सांगून रुग्णवाहिका तातडीने पोहोचण्याची व्यवस्था अधिक सक्षम करण्याचे निर्देश दिले.जिल्ह्यात १०८ क्रमांकावर केवळ १० रुग्णवाहिका उपलब्ध असल्याचे निदर्शनास आल्यानंतर,१०२ सेवेच्या आणखी ४० रुग्णवाहिका देखील अपघातस्थळी उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक प्रणाली विकसित करण्याचे निर्देश त्यांनी दिले.रस्ता सुरक्षा व वाहतूक नियमांची जाणीव विद्यार्थ्यांना लहान वयापासून व्हावी,यासाठी गडचिरोली येथे ट्राफीक पार्क उभारता येईल का,याची चाचपणी करून अभ्यासपूर्ण प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
‘ड्रंक अँड ड्राईव्ह’, राँग साईड,हेल्मेट,सीटबेल्ट आदी मोहिमांतर्गत करण्यात आलेल्या कारवाईचाही आढावा यावेळी घेण्यात आला.रत्यांवरील खड्यांबाबत जिल्ह्यातील सर्वाधिक तक्रारी राष्ट्रीय महामार्गांबाबत असल्याचे निदर्शनास आले असून, याबाबत आवश्यक उपाययोजना राबविण्याचे निर्देश त्यांनी दिले.परिवहन विभाग,सार्वजनिक बांधकाम, राष्ट्रीय महामार्ग व पोलिस विभाग यांनी समन्वयाने काम करून रस्ता सुरक्षा उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.बैठकीस वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक शरद मेश्राम,सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक जाधव तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पोलीस अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून एएसआयची आत्महत्या..

उद्रेक न्युज वृत्त  नवी मुंबई :-काही दिवसांपासून राज्यातील महाराष्ट्र पोलीस प्रशासनात खळबळ उडवून देणाऱ्या घटना उघडकीस येऊ लागल्या आहेत.मागील महिन्याच्या १६ ऑगस्टला नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील...

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

तलावात मासे पकडत असतांनाच पाय घसरल्याने तलावात पडला; चिमुकल्याचा तलावात बुडून मृत्यू.. -दुसऱ्या घटनेत भारतीय सैन्य दलातील जवानाचा पाण्यात बुडून मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील निलज गावातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. शाळेला सुट्टी असल्याने मित्रांसोबत गाव नजीकच्या तलावात मासे पकडण्यासाठी गेलेल्या...

गांजाची वाहतूक; तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त,दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर-बामणी मार्गावर सापळा रचून पोलिसांनी ओडिशातून आणलेला तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त केला.कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!