- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-जिल्ह्यात पूर्वी मोठ्या प्रमाणावर नक्षलवाद संघटन उदयास आला होता.त्यामुळे हिंसक कारवाया,हत्या,जाळपोळ व विध्वंसक घटनांमध्ये वाढ होत चालली होती.पोलीस-नक्षल चकमकीत कधी पोलीस शहीद व्हायचे तर कधी नक्षली ठार व्हायचे; त्यातच नक्षली घनदाट जंगल परिसरात वा बस्तान असलेल्या गावांमध्ये स्मारक बांधून शोक मनवायचे,अश्याच प्रकारे नक्षल्यांनी भामरागड तालुक्याच्या पेनगुंडा-नेलगुंडा मार्गावरील जंगलात स्मारक बांधले होते.पेनगुंडा येथे नुकतेच ११ डिसेंबर २०२४ ला नव्यानेच पोलिस मदत केंद्र उभारण्यात आले.यामुळे परिसरात हिंसक कारवाया करणे नक्षल्यांना अवघड झाले आहे.नक्षल्यांनी स्मारक बंधल्याची माहिती मिळताच पेनगुंडा येथील पोलिसांनी घटनास्थळी घाठत त्यांनी अहेरीच्या प्राणहिता पोलिस उपमुख्यालयातील बॉम्ब शोधक व नाशक पथक आणि विशेष अभियान पथकातील जवांनांच्या साह्याने नक्षल्यांनी बांधलेले स्मारक आज,शनिवार २८ डिसेंबरला उद्ध्वस्त केले आहे.
- Advertisement -

