Saturday, June 20, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तनक्षलवाद्यांकडून दोन नागरिकांची हत्या..

नक्षलवाद्यांकडून दोन नागरिकांची हत्या..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :- नुकतीच गडचिरोली 
जिल्ह्याच्या भामरागड तालुका मुख्यालयापासून १२ किलोमिटर अंतरावर असलेल्या कियर गावातील माजी सभापती तथा उपसभापती यांची शनिवारी १ फेब्रुवारीच्या रात्री सशस्त्र बंदूकधारी नक्षल्यांनी पोलीस खबऱ्या असल्याच्या संशयावरून मारहाण करीत गळा दाबून हत्या केल्याची घटना ताजी असतांनाच आता छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यातील बुगदीचेरू गावातील दोन नागरिकांची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे.नक्षलवाद्यांनी काल सोमवारच्या रात्री गावात जाऊन दोघांची हत्या केल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. हत्या केलेल्यांमध्ये करम राजू आणि माडवी मुन्ना अशी हत्या करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे आहेत.घटनेची माहिती मिळताच बिजापूर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले.पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले. या घटनेनंतर गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.यापूर्वीही नक्षलवाद्यांनी २६ जानेवारीला खबरी असल्याच्या संशयावरून भैरमगढ परिसरातील एका नागरिकाची हत्या केली होती.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता भाडेपट्ट्यावरील शासकीय जमिनींच्या अधिकार अभिलेखात असणार ‘महाराष्ट्र शासन’ कब्जेदार..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील भाडेपट्ट्याने प्रदान करण्यात आलेल्या शासकीय जमिनींच्या अधिकार अभिलेखातील नोंदी अधिक अचूक,पारदर्शक आणि एकसमान करण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.मुख्यमंत्री...

वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागभीड तालुक्यातील गिरगाव येथे आज,शुक्रवार १९ जून रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.आत्माराम दसरू बोरकर...

कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच नक्षली समर्थक पोलिसांच्या तावडीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-तब्बल अकरा वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा नक्षल समर्थक अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला.विशेष म्हणजे,कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच त्यास अटक करण्यात आली.त्याचा शोध...

देसाईगंजात सुगंधित तंबाखूविक्री जोमात; आरमोरीत अवैध सट्टा-पट्टी,तर कुरखेड्यात दारूचा महापूर..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध तालुक्यात अवैध धंद्यांनी डोके वर काढले असून देसाईगंज शहर व तालुक्यात सुगंधित तंबाखूची खुलेआम विक्री,तर आरमोरी शहरापासून ते ग्रामीण...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!