- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-पोलीस-नक्षल चकमकी दरम्यान सात पुरुष व पाच महिलांचे मृतदेह आढळून आल्याने घटनेतील मृत्यूची कारणमीमांसा जाणून घेण्यासाठी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १९६ अन्वये दंडाधिकारी चौकशी करण्यात येणार आहे. सदरची घटना एटापल्ली तालुक्यातील जारावंडी पोलीस स्टेशन,उपविभाग पेंढरी अंतर्गत येणाऱ्या वंडोली गाव जंगल परिसरात १७ जुलै २०२४ रोजी झालेल्या पोलीस व नक्षलवादी चकमकीत सात पुरुष व पाच महिलांचे मृतदेह आढळून आले होते.
चौकशी प्रक्रियेसाठी प्रत्यक्षदर्शी व्यक्तींनी किंवा या घटनेविषयी माहिती असलेल्या नागरिकांनी स्वतःचे लेखी निवेदन,शपथपत्रासह उपविभागीय दंडाधिकारी, एटापल्ली यांच्यासमोर जाहीर सूचना प्रसिद्धी झाल्यापासून २१ दिवसांच्या आत किंवा तत्पूर्वी कार्यालयीन वेळेत सादर करावे,असे आवाहन करण्यात आले आहे.अन्यथा आक्षेप नसल्याचे गृहीत धरून पुढील कार्यवाही करण्यात येईल,असे उपविभागीय दंडाधिकारी नमन गोयल यांनी स्पष्ट केले आहे.सदरच्या चौकशीमध्ये भाग घेणाऱ्यांनी घटनेचे वर्णन,स्वतःचा अनुभव,घटनेच्या आधी किंवा नंतर घडलेल्या संबंधित घटना,शासकीय किंवा अन्य यंत्रणांच्या प्रतिक्रिया,सहभाग व इतर संबंधित माहिती लेखी स्वरूपात सादर करावी.
- Advertisement -

