Sunday, October 25, 2026
Homeमुंबईनकली अधिकारी बनून आले अन् २५ लाख रुपये लुटून गेले..जणूकाही 'स्पेशल २६...

नकली अधिकारी बनून आले अन् २५ लाख रुपये लुटून गेले..जणूकाही ‘स्पेशल २६ चित्रपटच’…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

मुंबई: बॉलीवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमारचा स्पेशल २६ हा चित्रपट तुम्हाला माहितच असेल,ज्यात तो नकली अधिकारी बनून छापे टाकतो आणि व्यावसायिकांना लुटतो.तसाच प्रकार मुंबईत घडला आहे.मुंबईत पोलिस असल्याची बतावणी करत सहा जणांनी प्रसिद्ध मैसूर कॅफेच्या मालकाच्या घरात घुसून तब्बल २५ लाख रुपयांची लूट केली आहे. मुंबईतील सायन भागातील कॅफे मालकाच्या घरात गुन्हे शाखेचे अधिकारी असल्याची बतावणी करत सहा जण घुसले आणि त्यांनी २५ लाख रुपये लुटले.  सहा जणांपैकी चौघांना मुंबई पोलिसांनी अटक केली आहे.

शहरातील माटुंगा परिसरात लोकप्रिय मैसूर कॅफे चालवणाऱ्या व्यक्तीने पोलिसांना सांगितले की, मंगळवारी सायन हॉस्पिटलजवळ असलेल्या त्याच्या घरी सहा जण आले आणि त्यांनी मुंबई क्राइम ब्रँचचे अधिकारी असल्याची बतावणी केली.तक्रारीचा दाखला देत त्यांनी आम्ही निवडणूक ड्युटीवर असल्याचे सांगितले.तसेच लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने तुमच्या घरात पैसे ठेवल्याची माहिती मिळाली आहे; त्यावरुन आम्ही तपासायला आलो आहोत,असे त्यांनी सांगितले.

मुंबईत २० मे रोजी लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याचे मतदान होणार आहे.त्याचाच फायदा घेत चोरट्यांनी कॅफे मालकाला गंडा घातला.अधिकारी बनून आलेल्यांना कॅफे मालकाने सांगितले की, आमच्याकडे खाद्यपदार्थ व्यवसायातून केवळ २५ लाख रुपये रोख आहेत आणि या पैशांचा निवडणुकीशी काहीही संबंध नाही.त्यानंतर आरोपींनी २५ लाख रुपये घेतले आणि कॅफे मालकाला या प्रकरणात अडकवण्याची धमकी देत ते निघून गेले.

यानंतर जेव्हा कॅफे मालकाने सायन पोलिस ठाण्याशी संपर्क साधला; तेव्हा अशी कुठलीही धाड पडल्याची माहिती नसल्याचे पोलिसांना सांगितले.तसेच एकही पोलिस त्यांच्या घरी गेला नसल्याचेही पोलिसांनी त्यांना सांगतिले.तेव्हा त्यांना लुटले गेल्याचे समोर आले.त्यानंतर कॅफे मालकाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास सुरू केला.तपासादरम्यान पोलिसांनी सहापैकी चार आरोपींना अटक केली आहे.गुन्ह्यात निवृत्त पोलिस हवालदार आणि वाहतूक विभागाच्या कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचा संशय असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाघाच्या हल्ल्यात अंगणवाडी शिक्षिकेचा मृत्यू; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही तालुक्यात वाघाची दहशत पसरल्याचे दिसून येत आहे. काल शनिवारच्या सायंकाळी सिंदेवाही शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या पळसगाव जाट...

बापरे..! भाडेकरूच्या खोलीत आढळल्या लाखोंच्या बनावट नोटा..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.चक्क भाडेकरूच्या खोलीत लाखोंच्या बनावट नोटा आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ...

वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम सिंदेवाही(चंद्रपूर):-सिंदेवाही शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या पळसगाव जाट येथील शेतशिवारात वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल शनिवारच्या सायंकाळी...

आज चंद्राच्या लख्ख प्रकाशाची अनुभूती देणारी कोजागरी पौर्णिमा..

उद्रेक न्युज वृत्त :-धार्मिक श्रद्धा,कौटुंबिक स्नेह आणि सांस्कृतिक परंपरांचा संगम असलेल्या शरद ऋतूच्या प्रसन्न वातावरणात चंद्राच्या लख्ख प्रकाशाची अनुभूती देणारी कोजागरी पौर्णिमा आज,रविवार २५...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!