Thursday, July 16, 2026
Homeगडचिरोलीधान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची दिवसाढवळ्या फसवणूक….-राष्ट्रीय मानवाधिकार संघटना नवी दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष प्रणय...

धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची दिवसाढवळ्या फसवणूक….-राष्ट्रीय मानवाधिकार संघटना नवी दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष प्रणय खुणे यांनी मुख्यमंत्र्यांना केली तक्रार…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

मुख्य संपादक/सत्यवान रामटेके

गडचिरोली :- जगाचा पोशिंदा म्हटल्या जाणाऱ्या शेतकरी बांधवांची नेहमीच या.. ना.. त्या..कारणासाठी पिळवणूक केली जाते आहे.नेहमीच चिंताग्रस्त असणाऱ्या शेतकरी बांधवांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे.अशातच धान्य खरेदी केंद्रांवर शेतकरी बांधवांची लूट थांबवावी व अतिरिक्त धान खरेदी होत असल्याबाबत चौकशी करावी; अशी मागणी राष्ट्रीय मानवाधिकार संघटना नवी दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष प्रणय खुणे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.

आदिवासी महामंडळामार्फत चालू असलेल्या प्रादेशिक कार्यालय गडचिरोली अंतर्गत धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची दिवसाढवळ्या फसवणूक केली जात आहे.याबाबत जर कुणी शासनाच्या परिपत्रकाची गोष्ट केली तर केंद्र बंद करण्याची केंद्रप्रमुख शेतकऱ्यांना धमकी देत आहेत.शासनाच्या परिपत्रकानुसार प्रति बारदाना ४० किलो ६०० ग्राम खरेदी करावे असे सांगितले आहे.तसेच धानाची खरेदी करताना प्रति बारदाना हमाली सुद्धा शासन देणार हे सांगितले आहे.परंतु आदिवासी महामंडळच्या अभिकर्त्यांमार्फत शेतकऱ्यांकडून प्रति बोरा ४१.६०० किलोने खरेदी सुरू आहे.तसेच प्रति बारदाना ६ ते ८ रुपये इतकी हमाली सुद्धा शेतकऱ्यांकडून वसूल केल्या जात आहे.शेतकरी मोठ्या मेहनतीन धान विक्रीसाठी नोंदणी करतात.परंतु अभिकर्त्यांमार्फत अगोदर व्यापाऱ्याचा धान खरेदी केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या धानाची घरी जागा नसल्याने बाहेर उंदीर,घूस यांच्याकडून नासधूस होत आहे. शेतकरी आक्रमक नसल्याने यांच्या विरोधात जाण्यास घाबरतो.तक्रार केली तर आपला धान खरेदी केला जाणार नाही,अशी भीती शेतक-यांना असते.त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी खरेदी केंद्रांवर आपल्या यंत्रणेमार्फत नियंत्रण ठेवून शेतकरी बांधवाना न्याय द्यावा; अशी मागणी खुणे यांनी निवेदनातून केली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दहावीत शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार; दोन आरोपी फरार..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या आर्वी तालुक्यात एक धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.दोन नराधमांनी इयत्ता दहावीत शिकणाऱ्या मुलीच्या असह्यतेचा गैरफायदा घेत पैश्याचे आमिष दाखवून वारंवार...

गुरुजींची डोकेदुखी वाढली; विविध जबाबदारीचे ओझे लादून गुणवत्तेची अपेक्षा.. -पाणी डोक्याच्यावर गेल्यास काय खाक गुणवत्ता वाढणार?

उद्रेक न्युज वृत्त :-हल्ली शिक्षकांची अवस्था "ना घर के ना घाट के" अश्या प्रकारची झाली आहे.एक काळ होता जेव्हा शिक्षकाच्या हातात खड्डू आणि पुस्तक...

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या निकषात सुधारणा..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ च्या निकषात सुधारणा करण्याचा निर्णय मुंबई येथे मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र...

अखेर प्रतीक्षा संपली; लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणींची अखेर प्रतीक्षा संपली असून मागील महिन्याच्या दीड हजाराची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे.जून महिना संपून जुलै...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!