Thursday, April 16, 2026
Homeनागपूरधक्कादायक..! मुख्याध्यापिकेला संशय आला आणि विश्वासात घेत केली विचारपूस.. - नराधम वडील...

धक्कादायक..! मुख्याध्यापिकेला संशय आला आणि विश्वासात घेत केली विचारपूस.. – नराधम वडील आणि आजोबाने मिळून केला अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-एका गतिमंद १२ वर्षीय स्वतः च्याच अल्पवयीन मुलीवर नराधम वडील आणि आजोबने मिळून लैंगिक अत्याचार केल्याची घटना नागपूर जिल्ह्याच्या मौदा तालुक्यातील खात गावात उघडकीस आली असून प्रकरणी मुख्याध्यापिकेच्या तक्रारीवरून नागपूरच्या मानकापूर पोलिसांनी दोन्ही नराधमांना अटक केली आहे.३९ वर्षीय रमेश धनराज खोडके व ७५ वर्षीय धनराज कवडू खोडके दोघेही रा.खात,ता.मौदा, जि.नागपूर अशी आरोपींची नावे असून पीडिता ही तिच्या आईऐवजी वडिलांकडे राहत होती.ती गतिमंद असल्याने नागपुरातील गतिमंदांच्या निवासी शाळेत शिक्षण घेते. आरोपी रमेशला दारूचे व्यसन जडले आहे.त्यातच त्याचे आतापर्यंत तीन लग्न झाले आहेत.दारूच्या आहारी गेल्याने घरात नेहमी वादंग निर्माण होऊन तिन्ही पत्न्या त्याला सोडून गेल्या.त्याच्याजवळ एकही पत्नी राहत नसून तो व त्याचे वृद्ध वडील दोघेच राहतात.अश्यातच पीडिता उन्हाळ्याच्या सुट्टीत शाळेतून घरी परतली होती. दरम्यान,एप्रिल ते ऑगस्ट २०२५ या काळात वडील व आजोबा या दोघांनी मिळून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला.ती शाळेत गेल्यानंतर अस्वस्थ असायची, कुणाशीही बोलत नव्हती.पूर्वीची वागणूक व शाळेत आल्यानंतरच्या वागणुकीत बदल जाणवू लागला होता. त्यामुळे नेहमी आनंदी व हसत खेळत असणाऱ्या मुलीत बदल जाणवू लागल्याने मुख्याध्यापिकेला संशय आला आणि त्यांनी तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली. मुलीने आपबिती सांगताच मुख्याध्यापिकेला धक्काच बसला.प्रकरणी मुख्याध्यापिकेच्या तक्रारीवरून मानकापूर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता(बीएनएस) कलम ६४ (२)(क) (म),६५(२),३ (५) तसेच बालकांचे लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम २०१२ चे सहकलम ४,६ अन्वये गुन्हा नोंदविला व मानकापूर पोलिसांच्या सूचनेवरून मौदा तालुक्याच्या अरोली पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.आरोपी धनराज खोडके याचे खात गावातच घराला लागून छोटे दुकान आहे.त्या दोघांनी दुकानातच तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे तिने बयाणात सांगितले.ती गावाला घरी गेल्यानंतर वडील व आजोबा तिला कुणाशीही बोलू देत नव्हते व कुणाला भेटूदेखील देत नव्हते.दोघेही तिच्यावर सतत नजर ठेवून असायचे.तिला एकटे कुठेही जाऊ देत नव्हते व पोटच्या गोळ्यावर लैंगिक अत्याचार करीत होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उष्णतेची लाट; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,प्राथमिक व माध्यमिक शाळा राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-राज्याच्या विविध भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे.भारतीय हवामान विभागाने आज,बुधवार १५ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यास उष्णतेचा 'यलो अलर्ट' जाहीर केला होता.अश्यातच...

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १६ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत...

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील परिसरात वाघिणीने धुमाकूळ घालून गुरुवार,१९ मार्च २०२६ रोजी बाम्पेवाडा येथील ५० वर्षीय वसंत गणपत मेश्राम यांचा जीव घेतला...

आता प्रत्येक लाभार्थी कुटुंबास मिळणार तीन लिटर रॉकेल..

उद्रेक न्युज वृत्त :-जमाना कितीही बदलला तरीही 'जुनं ते सोनं' अशी अवस्था केवळ आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर झाल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र राज्याच्या विविध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!