Saturday, October 17, 2026
Homeकुरखेडादोन्ही पाय अधू असूनही कर्तव्यदक्ष असलेल्या विद्युत कर्मीचे स्थांतरण थांबविण्याकरीता गावकरी सरसावले..

दोन्ही पाय अधू असूनही कर्तव्यदक्ष असलेल्या विद्युत कर्मीचे स्थांतरण थांबविण्याकरीता गावकरी सरसावले..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा तालुक्यातील गोठणगांव चांदागड फिडरवर दोन्ही पायाला अपंगत्व असतांनाही मागील काही वर्षापासून कर्तव्य दक्षपणे सेवा बजावणारे सिनियर टेक्निशियन (लायनमॅन)प्रमोद गूडदे यांचे प्रस्तावित स्थातंरण रद्द करीत त्यांना याच ठिकाणी कायम ठेवण्यात यावे, अशी मागणी आज, गुरुवार २६ मार्च रोजी गावातील नागरिकांनी गडचिरोली विद्यूत वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता यांना कुरखेडा उपविभागीय अभियंता यांच्या मार्फत निवेदनाद्वारे केली आहे.
प्रमोद गूडदे हे दोन्ही पायांनी अपंग आहेत.मात्र या अपंगत्वाचा कोणताच बाऊ न करता ते रात्री बेरात्री गोठणगांव,चांदागड,सालईटोला येथील विद्यूत समस्येची माहीती मिळताच विलंब न करता सहकार्यासह कर्तव्याच्या ठिकाणी हजर होतात व दूरूस्ती कार्यवाही पूर्ण करून सगळ्यांशी सौजन्यपूर्ण वागणूकीमूळे ते परीसरात लोकप्रिय आहेत.अशा कर्तव्य दक्ष विद्यूत कर्मचाऱ्यांचे नियोजित स्थातंरण रद्द करण्यात यावे.या मागणी करीता आज गावकऱ्यांनी निवेदन दिले.याप्रसंगी गोठणगांव तंटामुक्ती समीतीचे अध्यक्ष वामन पाटनकर, शाळा व्यवस्थापन समीती अध्यक्ष देवेंद्र भोयर,वन हक्क समीती अध्यक्ष राजकूमार दूगा,माजी ग्राम पंचायत सदस्य हिरा माकडे,मयुर दोनाडकर,अतूल मेश्राम,संदिप कांबळी,विवेक दूगा,भागेश्वर सहारे,दिलेश दोनाडकर, नागेश सिंगाडे,देवदास दुगा तसेच गोठणगांव,चांदागड व सालईटोला येथील नागरिक उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विविध शिष्यवृत्तीसाठी एनएसपी व महाडीबीटी पोर्टलवर अर्ज नोंदणीचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या मॅट्रिकपूर्व व मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनांसाठी सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील अर्ज केंद्र शासनाच्या राष्ट्रीय...

बिलाच्या रकमेच्या १५ टक्के मोबदला म्हणून तीन लाख रुपयांच्या लाचेची मागणी; १ लाख २० हजार स्वीकारतांना ताब्यात.. -गडचिरोली जिल्ह्यातील स्विकृत नगरसेवकावर गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या अहेरी नगरपंचायतीतील एका ४० वर्षीय स्विकृत नगरसेवकाने नगरोत्थान योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या कामातील बिलाच्या रकमेच्या १५ टक्के मोबदला म्हणून ३ लाख...

प्रारूप मतदार यादीवरील दावे व हरकतींसाठी मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत(SIR)प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर दावे व हरकती दाखल करण्याची मुदत २६ ऑक्टोंबर २०२६ पर्यंत...

देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू,तिघेजण जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  नांदेड :-जिल्ह्याच्या माहूर तालुक्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे.माहूर तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये डोंगरावर वसलेल्या रेणुका मातेच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या टेम्पोचा माहूर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!