- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपुर :-बीसीएचे शिक्षण घेणारा २२ वर्षीय युवक सोबतच एमपीएससीचे क्लासेस करतो.मध्यंतरी त्याची दोन श्रीमंत तरुणींशी मैत्री झाली आणि नंतर त्यांचे प्रेमप्रकरण सुरू झाले.त्या दोघींनाही मौजमस्ती करण्याची आणि महागड्या गाड्यांमध्ये फिरण्याची सवय असल्याने त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी युवकाला वाहनांची गरज भासायची.यासाठी वाहन चोरी करावे लागेल म्हणून त्याने दुचाकी वाहनांचे लॉक कसे तोडायचे किंवा उघडायचे,याची माहिती यूट्यूबवरून जाणून घेतली आणि त्या माहितीच्या आधारे दुचाकी वाहने चोरायला सुरुवात केली.पण चोर कितीही शातिर असला तरीही तो एक ना एक दिवस सपडतोच,असाच काहीसा प्रकार युवकाच्या बाबतीत घडला अन् तो पल्सर चोरीच्या प्रकरणात कामठी(नवीन)पोलिसांच्या जाळ्यात अडकला.पोलिसांनी त्याला काल शुक्रवारी दुपारच्या सुमारास अटक करून त्याच्याकडून ५ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.निखिल योगेश रहांगडाले वय २२ वर्षे,रा.अनमोलनगर,वाठोडा,नागपूर असे अटक करण्यात आलेल्या आरोपी प्रियकर विद्यार्थ्याचे नाव आहे.
असा झाला भांडाफोड👇
कामठी-नागपूर मार्गालगच्या एका लॉनजवळून मनीष शाहू,रा.वाडी,ता.नागपूर(ग्रामीण)यांची एमएच-४९/सीई-००७३ क्रमांकाची पल्सर २३ नोव्हेंबरला चोरीला गेली.त्यामुळे त्यांनी कामठी(नवीन)पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली.पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता (बीएनएस)३०३(२)अन्वये गुन्हा नोंदवून या मार्गावरील ५० सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली.त्या आधारे त्यांनी काल शुक्रवारी दुपारी निखिलला नागपूर शहरातून ताब्यात घेत विचारपूस केली.त्याने मनीष शाहू यांची पल्सर चोरून नेल्याचे कबुली करीत चोरी करण्याचे कारणही पोलिसांना सांगितले.त्याचबरोबर, नागपूर शहरातील कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील महाल भागातून नोव्हेंबरमध्ये २ लाख ५० हजार रुपये किंमतीची एमपी-१७/झेडबी-१२१४ क्रमांकाची यामाहा मोटारसायकल चोरून नेल्याचे पोलिसांना सांगितले. प्रकरणी त्याच्याकडून दोन मोटारसायकली व एक मोबाइल फोन असा एकूण ५ लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.सदरची कारवाई पोलीस निरीक्षक महेश आंधळे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन यादव,नरेश खरागबान,नसीम अन्सारी,राहुल वाघमारे यांच्या पथकाने केली.
- Advertisement -

