Friday, June 26, 2026
Homeनागपूरदोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या व्यावसायिकाचा पुलाखाली पोत्यात बांधलेला आढळला मृतदेह..

दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या व्यावसायिकाचा पुलाखाली पोत्यात बांधलेला आढळला मृतदेह..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका व्यावसायिकाचा चक्क पोत्यात बांधलेला मृतदेह नागपुरातील नारा नदीच्या पुलाखालील नाल्याच्या कोरड्या भागात आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे.सदरची घटना आज,बुधवार २२ एप्रिल रोजी नागपूर शहराच्या जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली.परिसरातील स्थानिक नागरिकांना नाल्याच्या कोरड्या भागात संशयास्पद पोते दिसून आल्याने त्यांनी पोलिसांना माहिती दिली.त्यानंतर, जरीपटका पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल होत संशयास्पद पोते उघडून पाहताच त्यात मृतदेह आढळून आला.घटनास्थळी सहाय्यक पोलीस आयुक्त सत्यवान बंडीवार यांनीही प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली.प्राथमिक तपासात पोत्यात आढळून आलेला मृतदेह हा सुनिल साहू यांचा असल्याचे निष्पन्न झाले.साहू हे गेस्ट हाऊस व्यावसायिक होते.त्यातच,ते गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असल्याने कुटुंबीयांनी नागपूरच्या सदर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती.अश्यातच आज चक्क मृतदेह आढळून आल्याने हत्येचा संशय बळावला असून त्या दिशेने पोलीस तपास सुरू करण्यात आला आहे. दरम्यान,परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून अज्ञात मारेकऱ्यांचा पोलिसांकडून शोध सुरू करण्यात आला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विजांच्या कडकडाटासह पाऊस; अंगावर वीज कोसळून दोघांचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यात आज,शुक्रवार २६ जून रोजी विविध भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली.मात्र,विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे काही तालुक्यात वीज कोसळून दुर्घटना...

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गडचिरोलीतील ९६ आदिवासी विद्यार्थ्यांचे राष्ट्रपती भवनात केले स्वागत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :- "मोठी स्वप्ने पाहा,शिक्षणाच्या बळावर ती पूर्ण करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करा," असा प्रेरणादायी संदेश देत भारताच्या महामहिम राष्ट्रपती  द्रौपदी मुर्मू यांनी गडचिरोली...

डीआरआयची मोठी कारवाई; वन्यजीवांची आंतरराज्यीय तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय)प्रादेशिक युनिटने वन्यजीव तस्करीविरोधात मोठी कारवाई करत आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम जिल्ह्यात बेकायदेशीर वन्यजीव तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश...

घरून निघाला ‘तो’ परतलाच नाही; ५९ वर्षीय इसम दहा दिवसांपासून बेपत्ता..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-शहराच्या श्रीनगर वार्डातील केस कटिंगचा (न्हावी)व्यवसाय करणारा ५९ वर्षीय इसम घरून दुकानात जाण्यासाठी निघाला तो अद्यापही घरी परतला नसल्याने कुटूंबीय चिंताग्रस्त...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!