- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गोंदिया :-घरी कुणीही नसल्याची संधी साधून दोन चोरट्यांनी मिळून ४ लाख ३२ हजार ५०० रुपयांवर डल्ला मारला होता.प्रकरणी शहर पोलिसांनी दोन आरोपींना अटक करून १ लाख ८३ हजार १० रूपये किंमतीचा ऐवज जप्त केला होता.त्यानुसार न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केल्याने न्यायालयाने निकाल देत गोंदिया शहरातील घरफोडी प्रकरणात दोघा आरोपींना सहा महिन्यांचा कारावास आणि प्रत्येकी एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.सदरचा निर्णय मुख्य न्यायदंडाधिकारी कमल जयसिंघानी यांनी सुनावला आहे.फरहान ईशाक कुरेशी वय २१ वर्षे,रा.गौतमनगर आणि आशिक नरेंद्र बन्सोड वय २१ वर्षे रा.बाजपेयी वॉर्ड,गौतमनगर अशी आरोपींची नावे आहेत.
शहरातील देवकीनंदन हनुमानप्रसाद अग्रवाल वय ६१ वर्षे,रा. मुर्री रोड,गोंदिया हे २५ ते २६ मे २०२४ दरम्यान बाहेरगावी गेले असतांना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश करून लोखंडी आलमारीचे लॉकर फोडून सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम मिळून ४ लाख ३२ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला होता.यासंदर्भात शहर पोलिस ठाण्यात भादंवि कलम ४५४, ४५७,३८० अन्वये गुन्हा दाखल केला होता.तपासादरम्यान पोलिसांनी आरोपी फरहान ईशाक कुरेशी वय २१ वर्षे,रा.गौतमनगर आणि आशिक नरेंद्र बन्सोड वय २१ वर्षे रा.बाजपेयी वॉर्ड,गौतमनगर यांना अटक करून १ लाख ८३ हजार १० रूपये किंमतीचा ऐवज जप्त केला होता.सहाय्यक पोलिस निरीक्षक सोमनाथ कदम यांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते.साक्ष व पुराव्यावरून दोष सिद्ध झाल्याने दोघांना न्यायालयाने सहा महिने कारावास व प्रत्येकी एक हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
- Advertisement -

