Wednesday, August 26, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज आप तर्फे नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना विविध समस्यांचे निवेदन सादर 

देसाईगंज आप तर्फे नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना विविध समस्यांचे निवेदन सादर 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

देसाईगंज :- आमआदमी पक्षाच्या वतीने आज ३ एप्रिल २०२३ रोजी देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी कुलभूषण रामटेके यांना शहरातील विविध समस्यांची निवेदनाद्वारे जाणीव करून देत तात्काळ यावर अंमलबजावणी करण्यात यावी; यासंदर्भात आप पदाधिकऱ्यांच्या शिष्टंडळासह निवेदन सादर करण्यात आले आहे.

आम आदमी पक्षाने सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की,पोलीस स्टेशन बाजूचा मार्ग ते नगर परिषद  व तहसील कार्यालयाकडे जाणारा मार्गाची पुरती वाट लागली आहे.सदर मार्ग नगर परिषद हद्दीत असूनही रस्त्याकडे नगरप्रशासन व कुणीही लक्ष देत नाही.त्यामुळे मार्गावरून ये-जा करणारे वाहन धारकांची एखादेवेळी अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.नगर परिषदेच्या प्रशासनाने लक्ष घालावे व दुरुस्ती करावी.

मुख्य मार्गावरील व इतर मार्गावरील पथदिवे कित्येक दिवसापासून बंद आहेत नागरिकांना रात्रीच्या सुमारास नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत आहे.त्यामुळे बंद स्वरूपातील पथदिवे  लवकरात लवकर सुरु करण्यात यावे.देसाईगंज नैनपुर वार्डातील नगरपरिषद शाळेची भिंत अतिशय खराब अवस्थेत असल्याने सदर शाळेची रंगरंगोटी करण्यात यावी व  परिसरातील साफसफाई करण्यात यावी.परिसर स्वच्छ तर सर्वच नीटनेटके व विद्यार्थी रममय वातावरण राहणार.

जुनी वडसा मार्गावरील झेन लॉन च्या बाजूस असलेल्या नाल्याची गेली कित्येक वर्षांपासून  साफसफाई करण्यात आलेली नाही.परिणामी सदर नाला पूर्णपणे भरून राहत असल्यामुळे परिसरात दुर्गंधीचे वातावरण पसरलेले आहे.सकाळच्या सुमारास व सायंकाळच्या सुमारास शहरातील नागरिक सदर मार्गाने ये-जा करीत असल्याने दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.देसाईगंज नगर परिषद हद्दीतील समस्या अतिशय गंभीर स्वरूपाच्या असून याकडे गांभीर्य पूर्वक मुख्याधिकारी यांनी लक्ष घालावे; अशी मागणी देसाईगंज आम आदमी पक्षाच्या शिष्ट मंडळाद्वारे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदन सादर करतेवेळी फारुख पटेल,नाजूक लुटे, वामन पगाडे,प्रमोद दहिवले,अतुल ठाकरे,देवा जांभूळकर,शिल्पा बोरकर,दिपक नागदेवे व आपचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी; दीड हजार खात्यात येण्यास सुरुवात..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेतील पात्र लाभार्थी महिलांसाठी शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने मोठा निर्णय घेत मागील जुलै महिन्याच्या प्रलंबित...

उद्याला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले गडचिरोली दौऱ्यावर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून)शिवेंद्रराजे भोंसले हे उद्या,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.या दौऱ्यात ते जिल्ह्यातील...

बापरे..! स्मशानभूमीत रात्रीच्या अंधारात अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार.. -मांत्रिक पळाला घटनास्थळावरून..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या कुही तालुक्यात एका अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार गाव नजीकच्या स्मशानभूमीत उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या...

कुरखेडा शहरात पैगंबर जन्मोत्सव विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-इस्लाम धर्माचे प्रवर्तक प्रेषीत मोहम्मद पैगंबर यांची १५०१ वी जयंती आज,बुधवार २६ ऑगस्ट रोजी कुरखेडा शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवित उत्साहात साजरी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!