Friday, October 9, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज आदर्श महाविद्यालयात वाणिज्य विद्यार्थी अभ्यास मंडळाची स्थापना.. - विद्यार्थ्यांनी आत्मनिर्भर बनावे-...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयात वाणिज्य विद्यार्थी अभ्यास मंडळाची स्थापना.. – विद्यार्थ्यांनी आत्मनिर्भर बनावे- प्रा.डॉ.निलेश हलामी

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डाॅ.श्रीराम गहाणे यांच्या मार्गदर्शनात शैक्षणिक सत्र २०२६-२७ करिता वाणिज्य विद्यार्थी अभ्यास मंडळाची स्थापना करण्यात आली.वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता,नेतृत्वगुण, संशोधनवृत्ती,व्यावसायिक कौशल्ये तसेच उद्योजकतेची भावना विकसित करण्याच्या उद्देशाने या अभ्यास मंडळाची कार्यकारिणी गठीत करण्यात आली.
कार्यक्रमास वाणिज्य व व्यवस्थापन शाखेचे प्रमुख प्रा.डॉ.निलेश हलामी,वाणिज्य शाखेचे प्रा.अनिल होळी,प्रा.जितेंद्र राऊत,प्रा.अतुल देशमुख,प्रा.अंकिता कान्होलकर उपस्थित होते.यावेळी प्रा.डॉ.निलेश हलामी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, “आजच्या स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांनी केवळ पदवी मिळविण्यावर भर न देता विविध कौशल्ये आत्मसात करून आत्मनिर्भर बनले पाहिजे.वाणिज्य विद्यार्थी अभ्यास मंडळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नेतृत्व, संवादकौशल्य,आर्थिक साक्षरता,उद्योजकता आणि रोजगाराभिमुख कौशल्ये विकसित करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतील.”
अभ्यास मंडळाच्या माध्यमातून वक्तृत्व व वादविवाद स्पर्धा,प्रश्नमंजुषा,चर्चासत्रे,तज्ज्ञ मार्गदर्शन,उद्योजकता विकास कार्यक्रम,आर्थिक साक्षरता अभियान,औद्योगिक भेटी,संशोधन व प्रकल्प सादरीकरण यांसारखे विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग वाढवून त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणे,तसेच उच्च शिक्षण व रोजगाराच्या विविध संधींबाबत मार्गदर्शन करणे हा अभ्यास मंडळाचा प्रमुख उद्देश असल्याचे प्रा.डॉ. निलेश हलामी यांनी सांगितले.
सत्र २०२६-२७ साठी वाणिज्य विद्यार्थी अभ्यास मंडळाची कार्यकारिणी घठीत करण्यात आली.यात अध्यक्ष-पूर्वा राऊत,बी.काॅम अंतीम वर्ष,सचिव-जोष्णवी कोटागट्टू,बी.काॅम अंतीम वर्ष,सदस्य-हर्षल कोल्हे,बी.काॅम अंतीम वर्ष,कैकशा पठाण,बी.काॅम अंतीम वर्ष,छगन शेंडे, बी.काॅम द्वितीय वर्ष,प्रांजली झुरे,बी.काॅम द्वितीय वर्ष, श्रुती पिलारे,बी.काॅम प्रथम वर्ष,सुमित राऊत,बी.काॅम प्रथम वर्ष व संघटक म्हणुन प्रा.अनिल होळी यांची निवड करण्यात आली.
याप्रंसगी प्रा.जितेंद्र राऊत यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे संचालन पूर्वा राऊत,तर आभार तनुश्री झिलपे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीराम गहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली वाणिज्य विभागातील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ट्रॅव्हल्स धारकाकडून वसुली करणे भोवले; सहाय्यक पोलिस निरीक्षक निलंबित..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहराच्या वाहतूक विभागातील  खंडणीच्या कथित प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी...

अतितीव्र ध्वनी उपकरणांवर बंदी; ध्वनीक्षेपकांसाठी लेखी परवानगी आवश्यक अन्यथा कारवाई.. -जिल्हा पोलिस अधीक्षक एम.रमेश

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नवरात्रोत्सव,शारदा व दुर्गादेवी विसर्जन, विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली जिल्ह्यात ध्वनी निर्माण करणाऱ्या उपकरणांच्या वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत.पोलीस...

संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात कलम ३६ जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नवरात्र,शारदा-दुर्गा उत्सव,विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिन शांततेत पार पडावेत आणि कायदा व सुव्यवस्था राखली जावी,यासाठी पोलीस अधीक्षक एम.रमेश यांनी महाराष्ट्र पोलीस...

आता राज्यातील १८ तालुक्यांमध्ये दुष्काळाची तीव्रता; तालुक्यांची यादी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त :-दुष्काळ व्यवस्थापन संहिता २०१६ नुसार शासन स्तरावरून राज्यातील दुष्काळी परिस्थितीचे मूल्यांकन करण्याबाबत सविस्तर कार्यपध्दती विहित करण्यात आली आहे.खरीप २०२६ च्या हंगामातील...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!