- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मुंबई :-देशभक्तीपर सिनेमांसाठी ओळखले जाणारे अभिनेता मनोज कुमार यांचे आज,शुक्रवारी ४ एप्रिलला मुंबईच्या कोकिलाबेन रुग्णालयात वयाच्या ८७ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाले.मनोज कुमार हे अनेक दिवसांपासून आजारी असल्याने रुग्णालयात उपचार घेत होते. आज,शुक्रवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.मनोज कुमार देशभक्तीपर सिनेमांसाठी ओळखले जातात.मनोज कुमार यांनी सहारा, चांद, हनीमून,पूरब और पश्चिम, नसीब,मेरी आवाज सुनो, नील कमल,उपकार, पत्थर के सनम,पिया मिलन की आस यांसारख्या सिनेमांत काम केले होते.त्यांना नॅशनल अवॉर्ड,पद्मश्री आणि दादासाहेब फाळके पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. लहानपणापासूनच त्यांना सिनेमांची आवड होती. त्यांना सिनेमे पाहायला आवडत असे.दिलीप कुमार यांचा सिनेमा शबनम वरून त्यांचे मनोज कुमार हे नाव ठेवले होते.त्यांनी १९५७ मध्ये फॅशन शो मधून अभिनयात पदार्पण केले होते.१९६५ मध्ये त्यांच्या करिअरमध्ये मोठा गेमचेंजर झाला.शहीद या सिनेमाने त्यांचे करिअरच बदलून टाकले.यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही.मनोज कुमार यांचे सिनेमे केवळ हिटच झाले नाहीत तर त्यांची गाणीही लोकांच्या ओठांवर होती.त्यांचे उपकार या सिनेमातील गाणे ‘मेरे देश की धरती’ आजही लोकांच्या मन पटलावर ठेका धरायला लावते.
- Advertisement -

