Saturday, April 18, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तदारु प्यायला पैसे न दिल्याने मुलाने जन्मदात्या आईचाच निर्घृणपणे केला खून... ...

दारु प्यायला पैसे न दिल्याने मुलाने जन्मदात्या आईचाच निर्घृणपणे केला खून… – ‘क्रूर आणि रानटी’ गुन्ह्यासाठी फाशीची शिक्षा…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्रातील कोल्हापूरमधील घटना अंगावर शहारे आणि थरकाप उडवणारी आहे.आपल्या ६३ वर्षांच्या आईची हत्या करुन तिचे अवयव कापून खाल्लाचे हे प्रकरण आहे.या प्रकरणात आरोपीला दिलेली फाशीची शिक्षा मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे.इतका निर्घृण प्रकार याआधी पाहिला नसल्याची टिप्पणी उच्च न्यायालयाने या प्रकरणाबद्दल केली होती.हे प्रकरण २८ ऑगस्ट २०१७ मध्ये महाराष्ट्रातील कोल्हापूरमधील माकवाला वसाहतीत घडले होते.३५ वर्षाच्या मुलाने आपल्या आईची निघृण हत्या केली.दारु प्यायला पैसे न दिल्याने या मुलाने आपल्या जन्मदात्या आईलाच निर्घृणपणे मारले आहे. हा मुलगा एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने धारदार शस्त्राने आपल्या आईचे तुकडे करण्यास सुरुवात केली.पुढे त्याने आपल्या आईचे अवयव बाहेर काढले. या आरोपी मुलाले नाव आहे सुनील कुचकोरवी.या ‘क्रूर आणि रानटी’ गुन्ह्यासाठी कोल्हापूर सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली होती.ही फाशीची शिक्षा उच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे.फाशीची शिक्षा सुधारण्याची कोणतीही शक्यता नसल्याचे निरीक्षण न्या.रेवती मोहिते डेरे आणि न्या.पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने आरोपीच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केला आहे.२८ ऑगस्ट २०१९ मध्ये सुनील कुचकोरवी याने आपल्या ६३ वर्षांची आई यल्लमा कुचकोरवी यांची निर्घृणपणे हत्या केली.एवढ्यावर हा आरोपी मुलगा थांबला नाही तर त्याने मृतदेहाचे अवयव काढून त्याला मीठ, मसाला,तेल लावून पॅनमध्ये तळले आणि खाल्ले.२०२१ मध्ये कोल्हापूर सत्र न्यायालयाने कुचकोरवलीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.या शिक्षेबाबत राज्य सरकारने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.कुचकोरवीनेही शिक्षेला आव्हान दिले. मात्र उच्च न्यायालयाने शिक्षेवर शिक्कामोर्तब केले.कुचकोरवी याला जन्मठेपेची शिक्षा दिल्यास तो इतर कैद्यांसाठी धोकादायक ठरु शकतो.जी व्यक्ती आईची हत्या करु शकतो त्याचा इतरांना धोका अधिक.या व्यक्तीला सोडल्यास समाजात गुन्हा करण्याचे स्वातंत्र्य दिल्यासारखे असल्याचे न्यायालयाने नोंदविले.या सुनावणीला उच्च न्यायालयाने कुचकोरवीला पुण्यातील येरवडा कारागृहातून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे हजर करण्यात आले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धावत्या कारने अचानक घेतला पेट; सुदैवाने जीवितहानी टळली..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुलाचा सैनिकी शाळेच्या प्रवेश परीक्षेचा पेपर असल्याने चारचाकी वाहनाने गडचिरोलीसाठी निघालेल्या कुटुंबियांच्या कारने अचानकपणे आरमोरी-गडचिरोली मार्गावर पेट घेतल्याची घटना आज,शनिवार १८...

उन्हाच्या तडाख्यात कोसळणार अवकाळी पावसाच्या सरी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उन्हामुळे लाहीलाही होत आहे.सकाळी दहा वाजल्यापासूनच उकाड्याने नागरिक हैराण होऊ लागलेत.अनेक जिल्ह्यांचा पारा दिवसागणिक वाढू लागल्याने दुपारच्या...

वाढत्या उष्णतेपासून स्वतःचा बचाव करण्याचे आवाहन.. – उष्माघाताची लक्षणे आणि उपाययोजना..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-जिल्ह्यात सध्या तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून,कडक उन्हामुळे उष्माघात (Heat Stroke)होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ही बाब गांभीर्याने घेत जिल्हा आरोग्य...

सावधान..! प्रधानमंत्री लोन योजनेच्या नावाने बनावट जाहिरातीचा आधार..

उद्रेक न्युज वृत्त :-हल्ली फसवणूक करणाऱ्यांचे नेटवर्क दिवसेंदिवस वाढत चालल्याने नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे झाले आहे.कोणत्याही मोठ्या आमिषाला बळी पडण्यापूर्वी माहितीची खातरजमा करणे अत्यंत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!