Friday, September 4, 2026
Homeमुंबईदहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची सूचना.. - अकरावीची प्रवेश प्रक्रिया यंदा पूर्णपणे ऑनलाईन.....

दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची सूचना.. – अकरावीची प्रवेश प्रक्रिया यंदा पूर्णपणे ऑनलाईन.. – आता एकाच पोर्टलवरून १० कॉलेजसाठी करता येणार अर्ज..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-यंदा नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र इयत्ता १० वी परीक्षेचा निकाल मंगळवार १३ मे रोजी ऑनलाईन जाहीर करण्यात आला.त्यातच आता अकरावी प्रवेशाची लगबग सुरू होणार आहे.अश्यातच राज्यातील अकरावी प्रवेश प्रक्रिया यंदा पूर्णपणे ऑनलाईन करण्यात आली असून येत्या १९ मे ते २८ मे दरम्यान विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.यासाठी शिक्षण विभागाने https://mahafyjcadmissions.in या संकेतस्थळावर केंद्रीकृत प्रणाली उपलब्ध करून दिली आहे.विद्यार्थ्यांना अर्जासाठी १०० रुपये शुल्क भरावे लागेल.यापूर्वी ऑफलाइन अर्जासाठी हजारो रुपये मोजावे लागत होते.आता एकाच पोर्टलवरून १० कॉलेजसाठी अर्ज,दस्तऐवज अपलोड,गुणवत्तानुसार गुणवत्ता यादी आणि प्रवेश फेऱ्यांचे वेळापत्रक मिळणार आहे.प्रवेश प्रक्रिया पारदर्शक व संगणकीकृत असून कोणताही गैरव्यवहार होणार नाही.विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी विभागीय कक्ष व हेल्पलाइन (८५३०९५५५६४)आणि support@mahafyjcadmissions.in या ईमेलवर मार्गदर्शन उपलब्ध आहे.विद्यार्थ्यांनी ऑनलाइन प्रवेशासाठी किमान १ आणि जास्तीत जास्त १० प्राधान्यक्रम भरावे लागतील.जर पहिल्या पसंतीच्या महाविद्यालयात गुणांनुसार जागा मिळाली,तर तिथे प्रवेश घेणे बंधनकारक आहे.जर प्रवेश घेतला नाही,तर अशा विद्यार्थ्यांना पुढच्या दुसऱ्या,तिसऱ्या आणि चौथ्या फेरीत सहभागी होता येणार नाही.त्यांना फक्त ‘सर्वांसाठी खुली फेरी’ या शेवटच्या फेरीतच संधी मिळेल.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!