Thursday, September 3, 2026
Homeगडचिरोलीव्यायामशाळा बांधकाम व क्रीडांगणे उभारायची असेल तर करा अर्ज..-ग्रामपंचायती,शाळा,महाविद्यालये,आश्रमशाळा व शासकीय यंत्रणांसाठी...

व्यायामशाळा बांधकाम व क्रीडांगणे उभारायची असेल तर करा अर्ज..-ग्रामपंचायती,शाळा,महाविद्यालये,आश्रमशाळा व शासकीय यंत्रणांसाठी सुवर्ण संधी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा धोरणाअंतर्गत २०२५-२६ या आर्थिक वर्षाकरिता व्यायामशाळा विकास अनुदान योजना व क्रीडांगण विकास अनुदान योजना अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय गडचिरोली यांच्यामार्फत प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.
व्यायामशाळा विकास अनुदान योजना👇
 
व्यायामशाळा विकास योजनेअंतर्गत नविन व्यायामशाळेचे बांधकाम,इनडोअर व्यायाम साहित्य व ओपन जिम (खुली व्यायामशाळा) साहित्याचा पुरवठा केला जातो.यामध्ये आवश्यक साहित्य पुरवठा धारकांमार्फत उपलब्ध करून देण्यात येतो.
 
क्रीडांगण विकास अनुदान योजना👇
क्रीडांगण विकास अनुदान योजनेतून क्रीडांगण समपातळीकरण,२००/४०० मीटरचा धावपट्टी तयार करणे,विविध खेळांची प्रमाणित क्रीडांगणे उभारणे, प्रसाधनगृह,भांडारगृह बांधणे,पाणीपुरवठा सुविधा तसेच सुरक्षा कुंपण (भिंत अथवा तारांचे) उभारण्यास अनुदान दिले जाते.
‘या’ तारखे पर्यंत करा अर्ज👇
या योजनांचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा,अनुदानित माध्यमिक शाळा, महाविद्यालये,आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळा,ग्रामपंचायती व इतर शासकीय यंत्रणांनी   ३० जुलै २०२५ पर्यंत विहीत नमुन्यातील अर्जासह परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय गडचिरोली येथे सादर करावेत,असे आवाहन करण्यात आले आहे.
विशेषतः गावपातळीवरील नागरीकांना शारीरिक स्वास्थ्य व क्रीडा सुविधा उपलब्ध व्हाव्यात या हेतूने ग्रामपंचायतींनी खुल्या व्यायामशाळांसाठी तर आदिवासी शासकीय आश्रमशाळा व जिल्हा परिषद शाळांनी क्रीडांगण विकासासाठी तात्काळ प्रस्ताव सादर करावेत.या योजनांबाबत अधिक माहिती व अर्जाचा विहीत नमुना प्राप्त करण्यासाठी इच्छुक संस्थांनी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय क्रीडा व सांस्कृतिक भवन,कॉम्प्लेक्स एरिया,गडचिरोली येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा,असे जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे यांनी कळविले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.श्रीराम गहाणे यांना आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर.. -उच्च शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील महाविद्यालयीन,विद्यापीठ, अभियांत्रिकी व कला शिक्षण क्षेत्रात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या प्राचार्य व शिक्षकांचा यथोचित गौरव करण्याच्या उद्देशाने दरवर्षी “डॉ.जे.पी.नाईक आदर्श...

आजपासून पुढील पाच दिवस पावसाळी वातावरण..

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून विदर्भातील अनेक जिल्ह्यात रिमझिम पाऊस व उघडीप सुरू आहे. काल बुधवारी भंडारा व गोंदिया जिल्ह्यात ५ मिमी पावसाच्या...

आज पहाटे गडचिरोली जिल्ह्यात ३.६ तीव्रतेचा भूकंप..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्यात आज पहाटे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे ४ वाजून ३६ मिनिटांच्या सुमारास ३.६ तीव्रतेच्या भूकंपाची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!