Sunday, June 28, 2026
Homeमुंबईदहशतवादविरोधी पथकाचे नागपूर,भंडारा,चंद्रपूरसह रज्याभरात छापे..

दहशतवादविरोधी पथकाचे नागपूर,भंडारा,चंद्रपूरसह रज्याभरात छापे..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-दहशतवादविरोधी पथकाने आज,बुधवार १३ मे रोजी सकाळपासूनच राज्यभरात धडक कारवाईचा सपाटा चालवला.पाकिस्तानस्थित गँगस्टर शहजाद भट्टी याच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींच्या शोधासाठी मुंबईसह राज्यातील ४० पेक्षा अधिक ठिकाणी छापे टाकण्यात आले असून,तब्बल ५३ संशयितांची चौकशी सुरू आहे.आज बुधवारी सकाळपासूनच एटीएसच्या पथकांनी मुंबई,पुणे,नाशिक,जळगाव,अकोला,नांदेड, नागपूर,भंडारा आणि चंद्रपूर या ठिकाणी छापे टाकले. विशेष म्हणजे,भट्टी आणि त्याच्या सिंडिकेटच्या संपर्कात असल्याचा आरोप असलेल्या काही व्यक्तींच्या संशयास्पद हालचालींविषयी दहशतवादविरोधी पथकाकडे विशिष्ट माहिती होती.राज्यभरातून अशा ५३ व्यक्तींची ओळख पटवण्यात आली असून,त्यांच्या ठिकाणांचा शोध घेऊन चौकशी सुरू आहे.गेल्या आठवड्यात तपासकर्त्यांना असे आढळून आले की, पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयने शहजाद भट्टी मॉड्यूलशी संबंधित कार्यकर्त्यांमार्फत दिल्लीतील एका ऐतिहासिक मंदिरावर,दिल्ली-सोनीपत महामार्गावरील एका प्रसिद्ध ढाब्यावर आणि हरियाणामधील एका लष्करी छावणीवर हल्ल्यांची योजना आखली होती.दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने त्यांच्या ‘गँग बस्ट ऑपरेशन २.०’ अंतर्गत विविध राज्यांमधून अटक केलेल्या या मॉड्यूलच्या नऊ कथित हस्तकांच्या चौकशीदरम्यान हे खुलासे समोर आले होते. दिल्ली पोलिसांनी अलीकडेच ५ ते ७ मे दरम्यान राष्ट्रीय राजधानी, हरियाणा, पंजाब, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये संघटित गुन्हेगारी टोळ्या आणि त्यांच्या समर्थक नेटवर्कला लक्ष्य करून राबवलेल्या ४८ तासांच्या मोहिमेदरम्यान,भट्टीशी संबंधित नऊ कार्यकर्त्यांसह ४८२ कथित गुंड आणि त्यांच्या साथीदारांना अटक केली. आरोपींना उत्तर भारत आणि दिल्ली-एनसीआर प्रदेशातील सुरक्षा कर्मचाऱ्यांवर अंदाधुंद गोळीबार करण्याचे काम सोपवण्यात आले होते.त्यांच्यापैकी काही जण शहजाद भट्टी नेटवर्कसाठी शस्त्रांच्या तस्करीमध्ये कथितरित्या सामील होते.शहजाद भट्टी हा परदेशात बसून आपली टोळी चालवतो.तो सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतातील तरुणांना भडकवून त्यांना देशविरोधी कारवायांकडे वळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा संशय आहे.दरम्यान,एटीएस पथकाने आज चंद्रपूर जिल्ह्याच्या गोंडपिपरी येथील एका विद्यार्थ्याची चौकशी केली.संबंधित विद्यार्थी मूळचा अहेरी येथील रहिवासी असून शिक्षणासाठी सध्या गोंडपिपरी येथे वास्तव्यास आहे.सोशल मीडियावर काही संशयित अकाउंट्सशी त्याचा संपर्क असल्याची माहिती एटीएसला मिळाल्यानंतर नागपूर येथील एटीएस पथकाने त्याची चौकशी सुरू केली.तपासादरम्यान विद्यार्थ्याच्या मोबाईलमधील सोशल मीडिया अकाउंट्स,संपर्क तसेच ऑनलाइन हालचालींची पडताळणी करण्यात आली.विशेषतः पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी गँग आणि डोंगरी गँगशी संबंधित अकाउंट्स फॉलो केल्यामुळे एटीएस सतर्क झाली होती. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्याचे कोणत्याही गुन्हेगारी किंवा राष्ट्रविरोधी घटकांशी संबंध आहेत का,याचा सखोल तपास करण्यात आला.त्याचबरोबर,भंडारा शहरातील मोठाबाजार परिसरात नागपूर दहशतवाद विरोधी पथकाने आंतरराष्ट्रीय टोळीशी संबंध असल्याच्या संशयावरून शहरातील एका मोबाईल शॉपमधील कर्मचाऱ्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. संबंधित तरुण एका मोबाईल विक्रीच्या दुकानात काम करतो.हा तरुण सोशल मीडियाच्या माध्यमातून काही संशयास्पद व्यक्तींच्या संपर्कात असल्याचा संशय एटीएसला होता.त्या आधारे एटीएसच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने दुकानावर धाड टाकून त्याला ताब्यात घेतले. यावेळी त्याचा मोबाईल संच देखील तपासणीसाठी जप्त करण्यात आला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अवैध रेती उत्खनन प्रकरणी मंडळ अधिकारी व तलाठ्याची विकेट.. – देसाईगंज तहसीलदारही होणार निलंबित; कोंढाळा-सिंड्राई रेती घाट प्रकरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यातील  कोंढाळा-सिंड्राई वैनगंगा नदी रेतीघाट परिसरात अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर पलटी होऊन एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याच्या घटनेची गंभीर...

उद्या होणारी शिक्षक पात्रता परीक्षा रद्द; पेपरफुटीने खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच वैद्यकीय प्रवेशासाठी घेतली जाणारी 'नीट यूजी-२०२६' ची परीक्षा पेपरफुटीमुळे रद्द करून नव्याने घ्यावी लागल्याने देशभरात एकच खळबळ उडाली होती.अश्यातच आता...

उद्याला पल्स पोलिओ लसीकरण मोहीम.. -२ हजार ३०८ लसीकरण केंद्रे,१२३ ट्रान्झिट व ९८ मोबाईल पथके सज्ज..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहू नये,या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत उद्या,रविवार २८ जून २०२६ रोजी संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रीय...

मी काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे; पदासाठी किंवा सत्तेसाठी विचारांशी तडजोड करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.. – विजय वडेट्टीवारांनी शिंदे सेनेतील प्रवेशाचे वृत्त फेटाळले..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नुकतेच उद्धव ठाकरे गटातील सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली.खासदारांच्या पक्षप्रवेशामुळे केंद्रात शिंदे गटाचे वजन वाढले...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!