Monday, October 26, 2026
Homeगोंदियातीन महिन्यांसाठी अवैध दारू विक्रेत्यास केले तडीपार….. 

तीन महिन्यांसाठी अवैध दारू विक्रेत्यास केले तडीपार….. 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गोंदिया :- आरोपी दिलीप अंबुले विरुद्ध दवनीवाडा पोलिस ठाण्यात अवैध दारूविक्रीसह विविध प्रकारचे २३ गुन्हे दाखल आहेत.तो सराईत गुन्हेगार असून मगरूर व धाडसी प्रवृत्तीचा आहे.त्याच्या कृतीमुळे बघोली, परसवाडा,दवनीवाडा परिसरातील महिला,मुली व प्रतिष्ठित सर्वसामान्य नागरिकांच्या मनात दहशत निर्माण झाली आहे.तसेच लोकांच्या मालमत्तेस धोका निर्माण झाला असल्याने सर्वसाधारण व्यक्ती त्याचेविरुद्ध उघड साक्ष देण्यास येत नाहीत. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध वारंवार कारवाई करूनसुध्दा त्यात सुधारणा झाली नाही.या गुन्हेगाराच्या कृतीमुळे परिसरातील सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था धोक्यात आली आहे.यामुळे दवनीवाडा ठाणेदारांनी त्याला गोंदिया जिल्हा हद्दीतून तडीपार करण्याकरिता कलम ५६ (अ), (ब) महाराष्ट्र पोलिस अधिनियम अन्वये प्रस्ताव तिरोडा येथील उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे सादर केला होता.उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांच्या आदेशानुसार प्रमोद मडामे यांनी विहित मुदतीत प्रस्तावाची प्राथमिक चौकशी पूर्ण करून या गुन्हेगारास गोंदिया जिल्हा हद्दीतून तडीपार करण्याची शिफारस केली होती.

दवनीवाडा पोलिस ठाण्यांतर्गत ग्राम बघोली येथील अवैध दारूविक्रेता दिलीप मनिराम अंबुले वय ५५ वर्षे याला जिल्ह्यातून 3 महिन्यांपर्यंतच्या कालावधीकरिता तडीपार करण्यात आले आहे.सदर आदेश १८ ऑगस्ट रोजी उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी पूजा गायकवाड यांनी काढला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उपाययोजनांचे सकारात्मक फलित; गडचिरोली जिल्ह्यात रस्ते अपघातातील मृत्यूंमध्ये २७ टक्के घट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जानेवारी ते सप्टेंबर २०२६ या नऊ महिन्यांत रस्ते अपघातांतील मृत्यूंच्या संख्येत गतवर्षीच्या समान कालावधीच्या तुलनेत २७ टक्के घट नोंदविण्यात आली...

विधान परिषद निवडणूक; उद्याला तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या उमेदवारांचा फैसला..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधानपरिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या पाच जागांसाठी शुक्रवार २३ ऑक्टोंबर २०२६ रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडली.यामध्ये नागपूर पदवीधर...

ट्रॅव्हल्सद्वारे विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या तीन महिलांना रंगेहात अटक..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-नागपूरहून ट्रॅव्हल्सद्वारे विदेशी दारूची अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्या मध्य प्रदेशातील तीन महिलांना चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चंद्रपुरातील वरोरा नाका चौकात सापळा...

धावत्या इलेक्ट्रिक बसला भीषण आग; जीवितहानी टळली..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-राज्य परिवहन महामंडळाच्या एका धावत्या इलेक्ट्रिक 'शिवाई' बसला अचानक भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना आज,सोमवार २६ ऑक्टोंबर रोजी सकाळच्या सुमारास पुणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!