Thursday, June 4, 2026
Homeपुणेतळ्यात पोहायला गेले; पण दमछाक होऊन मृत्युमखी पडले.. - चार शालेय विद्यार्थ्यांचा...

तळ्यात पोहायला गेले; पण दमछाक होऊन मृत्युमखी पडले.. – चार शालेय विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

पुणे :-जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील चाकण गावाजवळील कडाचीवाडी येथील तळ्यात(गाव तलाव)पोहायला गेलेल्या चार शालेय विद्यार्थ्यांचा पोहतांना दमछाक होऊन बुडून मृत्यू झाल्याची घटना आज,शनिवार ३१ मे रोजी दुपारी साडे तीन वाजेच्या सुमारास घडली.१.ओमकार बाबासाहेब हंगे वय १३ वर्षे,हल्ली रा.मार्तंडनगर,मेदनकरवाडी,मूळ रा.हंगेवाडी,ता.केज,जि.बीड.२.श्लोक जगदीश मानकर वय १३ वर्षे,हल्ली रा.मेदनकरवाडी,मूळ रा.धनवडी, ता.वरुड, जि.अमरावती.३.प्रसाद शंकर देशमुख वय १३ वर्षे,हल्ली रा.मेदनकरवाडी,मूळ रा.अंबुलगा,ता.मुखेड, जि.नांदेड.४.नैतिक गोपाल मोरे वय १३ वर्षे,हल्ली रा. मेदनकरवाडी,मूळ रा.बुलढाणा झरी बाजार,ता.अकोट, जि.अकोला,असे तळ्यात बुडून मृत्यु झालेल्या शालेय विद्यार्थ्यांची नावे आहेत.

वरील चारही शालेय विद्यार्थी आज शनिवारी मौज- मजा म्हणून सकाळच्या सुमारास साडे अकरा वाजेच्या दरम्यान घरून चाकण गावाजवळील कडाचीवाडी येथील तळ्यात पोहायला गेले होते.पोहण्यासाठी तळ्यात उतरले.पण तळ्यात पाणी जास्त असल्याने पोहतांना चौघांनाही दमछाक झाली.त्यामुळे बाहेर निघण्याचा प्रयत्न करीत असतांनाच चौघांचाही बुडून मृत्यू झाला होता. लागलीच बराच वेळ होऊनही चौघेही घरी न परतल्याने कुटुंबीयांनी सर्वत्र शोधाशोध केली.अशातच गाव तलावाच्या काठावर त्यांच्या चपला व कपडे आढळून आले.त्यानुसार स्थानिक नागरिकांसह आपदा मित्रांच्या मदतीने पोलिसांनी पाण्यात बुडालेल्या मुलांचे मृतदेह बाहेर काढताच कुटुंबीयांनी एकच टाहो फोडला.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

डिझेलचा टँकर पलटी होताच इंधन नेण्यासाठी लोकांची झुंबड..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-आधीच इंधन कमतरतेमुळे पेट्रोल पंपावर गर्दी होतांना दिसून येते.अश्यातच एखाद्या घटनेत चक्क इंधनाचा टँकर पलटी होऊन डिझेलचा महापूर होत असल्याची बाब...

तूर प्रमाणित बियाणे वितरण घटकाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवरील ‘शेतकरी योजना’ या उपक्रमांतर्गत कडधान्य आत्मनिर्भरता अभियान सन २०२६-२७ अंतर्गत तूर प्रमाणित बियाणे वितरण घटकाचा लाभ घेण्यासाठी...

गोदाम बांधकाम,तेल काढणी युनिट,कडधान्य प्रक्रिया व पॅकेजिंग युनिटसाठी लाखो रुपयांपर्यंत अनुदान.. – बना स्वतःच मालक; ऑफलाईन अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील भुईमूग,करडई,तीळ यांसारख्या तेलबिया पिकांचे तसेच तूर,हरभरा व इतर कडधान्यांचे उत्पादन वाढविण्यासोबतच त्यांचे मूल्यवर्धन आणि शेतकऱ्यांना अधिक आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी...

शाळेची पहिली घंटा वाजणार ‘या’ दिवशी..!

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील वाढती उष्णता लक्षात घेता यंदा शाळेची पहिली घंटा उशिरा सुरू होण्याच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला असून यंदा २०२६-२७ या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!