Saturday, April 18, 2026
Homeगडचिरोलीतरुणीच्या असहाय्यतेचा फायदा; बळजबरीने गर्भपात करण्यास भाग पाडणाऱ्या कंत्राटदाराविरूध्द गुन्हा दाखल..

तरुणीच्या असहाय्यतेचा फायदा; बळजबरीने गर्भपात करण्यास भाग पाडणाऱ्या कंत्राटदाराविरूध्द गुन्हा दाखल..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्याच्या अहेरी तालुक्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.पेशाने कंत्राटदार असलेल्या ३० वर्षीय तरुणाने तरुणीच्या असहाय्यतेचा फायदा घेत प्रेमाच्या जाळ्यात ओढले व नंतर लग्नाचे आमिष दाखवून पीडितेला गर्भवती केले. पीडित तरुणीने लग्नाचा तगादा लावताच नकार देत बळजबरीने गर्भपात करण्यास भाग पाडल्याची घटना नुकतीच तीन दिवसांपूर्वी अहेरी शहरात उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे.पीडित तरुणीने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली.विशेष म्हणजे,२७ वर्षीय पीडित तरुणी परिचारिकेचे काम करते.प्रकरणी आरोपी तरुणावर अहेरी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ६९,२४१, ३५१(२)या सह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये विविध कलमान्वये गुन्हा नोंदवताच आरोपी फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे.अभिषेक सतीश आईलवार वय ३० वर्षे,रा.ता.अहेरी,जि.गडचिरोली असे आरोपीचे नाव असून जुलै २०२४ ते ऑक्टोंबर २०२५ या दरम्यान त्याने पीडितेच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले.पीडिता गर्भवती राहिल्यानंतर लग्नास नकार देऊन उलट बदनामी करण्याची भीती दाखवली. त्यानंतर,आरोपीने बळजबरीने गर्भपात करण्यास भाग पाडले.जेव्हा पीडितेने लग्नासाठी तगादा लावला,तेव्हा लग्नाला स्पष्ट नकार दिला.एवढेच नव्हे तर,गर्भधारणेचे सर्व पुरावे आणि कागदपत्रेही त्याने जाळून नष्ट केली. प्रकरणी पीडितेने अहेरी पोलिस ठाणे गाठून आपबीती कथन केली.प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता अहेरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी अजय कोकाटे यांनी
तक्रारीची गंभीर दखल घेतली आणि पोलिसांना आरोपीस तात्काळ अटक करण्यास सांगितले.अद्याप आरोपी फरार असून अहेरी पोलीस त्याच्या मागावर आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मोहफुले वेचत असतांनाच बिबट्याचा हल्ला.. – जंगलशिवारात छिन्नविच्छिन्न अवस्थेत आढळला मृतदेह..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर वनपरिक्षेत्राच्या हरदोली सहवनक्षेत्रातील ३३६ कक्ष क्रमांकाच्या सोनेगाव बीटातील एकमध्ये बिबट्याने मोहफुले वेचत असणाऱ्या महिलेच्या मानेवर हल्ला चढवून ठार केल्याची...

बालविवाह रोखण्यासाठी प्रशासन ॲक्शन मोडवर.. – ग्रामीण भागात बालविवाह रोखण्याची जबाबदारी ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांवर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर दरवर्षी बालविवाहाच्या घटना घडण्याची शक्यता लक्षात घेता  गडचिरोली जिल्हा प्रशासन व महिला व बालविकास विभाग ॲक्शन मोडवर आले आहे.या...

उष्णतेचा कहर; उद्याला नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळा आणि शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचे आदेश..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-वाढत्या उष्णतेच्या लाटेचा कहर लक्षात घेता नागपूर जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारतीय हवामान विभागाने उद्या,शनिवार १८ एप्रिल रोजी नागपूर...

खताचा काळाबाजार भोवला; देसाईगंजच्या कृषी केंद्र संचालकावर फौजदारी गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेतकऱ्यांच्या हक्काचे अनुदानित डीएपी खत(DAP)अनधिकृतरीत्या जिल्ह्याबाहेर विकणे,खताचा काळाबाजार करणे तसेच शासकीय ई-पॉस(e-POS) प्रणालीमध्ये फेरफार केल्याप्रकरणी देसाईगंज येथील मे.नाकाडे कृषी केंद्रचे संचालक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!