Thursday, June 4, 2026
Homeदेसाईगंजडॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त "एक वही एक पेन अभियान"….-दुर्गम भागातील गरजू...

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त “एक वही एक पेन अभियान”….-दुर्गम भागातील गरजू विद्यार्थ्यांना केले जाणार वाटप…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

देसाईगंज(गडचिरोली) :- भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणासाठी नेहमीच आग्रह धरला. ‘शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे’; ते जो कुणी प्राशन करेल; असा व्यक्ती वाघिनिसारखे गुरगुरल्या शिवाय राहणार नाही.शिक्षणाची कास धरून प्रगती करा; असा संदेश त्यांनी दिला.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी,महापरिनिर्वाणदिनी,धम्मचक्र प्रवर्तनदिनी लाखोंच्या संख्येने पुस्तकांची खरेदी-विक्री होते.याच उद्देशाने फेस ऑफ आंबेडकराईट मुव्हमेंट (फॅम)द्वारे शिक्षणाचे महत्त्व तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी मुंबईसह राज्यभर “एक वही एक पेन अभियान” राबवले जात आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देसाईगंज (वडसा) शहरामध्ये मोठ्या संख्येने जनसमुदाय दीक्षाभूमी येथे अभिवादन करण्यासाठी येतात.यावेळी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी फुले,माळ आणि मेणबत्ती आणली जाते; मात्र फॅमच्या वतीने या वर्षी “एक वही एक पेन अभियान” सुरू करण्यात आले आहे.सनोज खोब्रागडे,प्रतिक लाडे, मयंक मेश्राम,विक्की राऊत,तुषार राहाटे,आतिश राहाटे,सुमेध मेश्राम,हर्ष माटे,रोहित जनबंधू,मोहितेश शिंपोलकर या युवा विद्यार्थ्यानी हे उपक्रम राबवले असून या उपक्रमाच्या माध्यमातून गोळा करण्यात आलेले वही पेन दिनांक-३ जानेवारी २०२४ रोजी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि १२ जानेवारी २०२४ रोजी राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त दुर्गम भागातील गरजू विद्यार्थ्यांना वाटप केले जाणार आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अल्पवयीन मुलांची प्रेयसीची हौस पुरवण्यासाठी लाखो रुपयांची चोरी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-दोन अल्पवयीन मुलांनी चक्क प्रेयसींची हौस पुरवण्यासाठी लाखो रुपयांची चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार पोलीस तपासात समोर आल्याने पोलिसही चक्रावून गेल्याची घटना...

जिल्हास्तरीय युवा पुरस्कार २०२५-२६ साठी प्रस्ताव स्वीकारण्यास मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय,पुणे यांच्या वतीने राज्याचे युवा धोरण २०१२ अन्वये जिल्हास्तरीय युवा पुरस्कार सन २०२५-२६ साठी पात्र...

डिझेलचा टँकर पलटी होताच इंधन नेण्यासाठी लोकांची झुंबड..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-आधीच इंधन कमतरतेमुळे पेट्रोल पंपावर गर्दी होतांना दिसून येते.अश्यातच एखाद्या घटनेत चक्क इंधनाचा टँकर पलटी होऊन डिझेलचा महापूर होत असल्याची बाब...

तूर प्रमाणित बियाणे वितरण घटकाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवरील ‘शेतकरी योजना’ या उपक्रमांतर्गत कडधान्य आत्मनिर्भरता अभियान सन २०२६-२७ अंतर्गत तूर प्रमाणित बियाणे वितरण घटकाचा लाभ घेण्यासाठी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!