Sunday, May 31, 2026
Homeगडचिरोली‘डिजिटल शेतीशाळा’ उपक्रम; ४५३ गावांमध्ये यशस्वी..

‘डिजिटल शेतीशाळा’ उपक्रम; ४५३ गावांमध्ये यशस्वी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा २.० अंतर्गत गडचिरोली जिल्ह्याची निवड करण्यात आली असून या प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकरी तसेच भूमिहीन कुटुंबांना कृषी आधारित उपजीविकेची साधने उपलब्ध करून देण्यावर भर दिला जात आहे.यामुळे शेती अधिक किफायतशीर करण्यास मदत होत आहे.
बदलत्या हवामानाचा शेतीवर होणारा परिणाम कमी करण्यासाठी गावनिहाय नियोजन करण्यात आले असून त्याअंतर्गत ‘डिजिटल शेतीशाळा’ हा उपक्रम अभियान स्वरूपात राबविण्यात येत आहे.हवामान अनुकूल तंत्रज्ञान(CRT)विषयक मार्गदर्शनासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प व पानी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन व्यासपीठाच्या माध्यमातून तज्ज्ञांकडून शेतकऱ्यांना शास्त्रोक्त व पीकनिहाय मार्गदर्शन करण्यात आले. झूम आणि यूट्यूबच्या माध्यमातून हे मार्गदर्शन सत्र घेण्यात आले.या डिजिटल शेतीशाळेच्या पहिल्या सत्रात पेरणीपूर्व तंत्रज्ञानावर विशेष भर देण्यात आला.यामध्ये बेड तयार करणे,बेडवर टोकण करणे,आंतरपीक पद्धत अवलंबणे,बीज उगवण क्षमता चाचणी तसेच बीजप्रक्रिया यांसारख्या महत्त्वपूर्ण बाबींवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
सदर डिजिटल शेतीशाळा ही बुधवार,१ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ७.३० वाजता सुरू करण्यात आली. जिल्ह्यातील कृषी विभागाचे अधिकारी व समूह सहाय्यक यांच्या माध्यमातून हा उपक्रम गावपातळीवर राबविण्यात आला.जिल्ह्यातील एकूण ४५३ गावांमध्ये या शेतीशाळांचे आयोजन करण्यात आले असून शेतकरी,महिला बचत गट सदस्य,महिला शेतकरी तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांचे सदस्य यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
शेतीसंदर्भातील विविध समस्या चर्चेच्या माध्यमातून मांडण्यात आल्या असून तज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून त्यांचे निराकरण करण्यात आले.आगामी खरीप हंगामात या तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना निश्चितच फायदा होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.दरम्यान, पुढील नियोजित डिजिटल शेतीशाळांमध्ये जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रिती हिरळकर यांनी केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

एमडी ड्रग्सची तस्करी; आरोपीकडून साडेसात किलो ड्रग्स जप्त.

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने आज,रविवार ३१ मे रोजी मोठी कारवाई करत एका तरुणास अटक करून त्याच्याकडून तब्बल ७ किलो ५०० ग्रॅम...

शेतातील विहिरीत पडून वाघाचा मृत्यू; वन विभागात खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम/सिंदेवाही(चंद्रपूर):-ब्रम्हपुरी वन विभागांतर्गत येणाऱ्या सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील डोंगरगाव नियतक्षेत्र अंतर्गत हजारीचक(ता.सिंदेवाही) येथील शेतातील कठडे नसलेल्या विहिरीत पडून एका प्रौढ नर वाघाचा मृत्यू...

उद्यापासून वादळी पावसाचा अंदाज; शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-सध्या राज्यातील हवामानात बदल होण्यास सुरुवात झाली असून उद्या,सोमवार १ जून पासून सुरु होणाऱ्या आठवड्यातील हवामानात अजून बदल होणार आहे.हवामान खात्याने,प्रामुख्याने...

तरुणाने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-एका ३६ वर्षीय विवाहित तरुणाने राहत्या घरीच गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याची घटना आज,रविवार ३१ मे रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा शहरातील...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!