Tuesday, August 25, 2026
Homeमुंबईजुनी पेन्शनसाठी १७ लाखांच्या वर एकवटले कर्मचारी- तब्बल ४६ वर्षांनंतर सर्व थरांतील अधिकारी-कर्मचारी...

जुनी पेन्शनसाठी १७ लाखांच्या वर एकवटले कर्मचारी- तब्बल ४६ वर्षांनंतर सर्व थरांतील अधिकारी-कर्मचारी एकटवले

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

मुंबई :- २००४ पासून बंद केलेली जुनी पेन्शन योजना लागू करावी; या मागणीसाठी राज्य सरकारचे शासकीय व निमशासकीय,शिक्षक व शिक्षकेतर १७ लाखांच्या वर कर्मचारी मंगळवार १४ मार्च म्हणजे आजपासून  बेमुदत संपावर गेले आहेत.या संपामुळे शासकीय रुग्णालये,शाळा,पंचायत समित्या,महापालिका,जिल्हा परिषदा तसेच तहसील कार्यालयांसह सरकारी विभागांचे कामकाज ठप्प होणार झाले.तब्बल ४६ वर्षांनंतर सर्व थरांतील अधिकारी-कर्मचारी एकटवले असून त्यांनी राज्यव्यापी संप पुकारला आहे.

नवीन पेन्शन योजना रद्द करणे,प्रदीर्घकाळ सेवेतील कंत्राटी कामगारांना समान वेतन,सर्व रिक्त पदे तात्काळ भरणे,कोणत्याही अटीशिवाय अनुकंपा तत्वावरील नियुक्त्या करा,सर्व भत्ते केंद्रासमान मंजूर करा,निवृत्तीचे वय ६० करा,नवीन शिक्षण धोरण रद्द करा,आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समस्यांचे तात्काळ निराकारण करा व इतर विविध मागण्या केल्या आहेत.

आयुष्यभर लोक काम करतात त्यामुळे त्यांना पेन्शन मिळालीच पाहिजे,असे काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.सरकारने कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. आज विरोधकांनी सरकारी कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना, शेतकरी प्रश्न, किसान सभेचा लाँग मार्च या मुद्यावरुन सरकारला धारेवर धरले आहे. जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे या मताचा मी असल्याचे मत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात म्हणाले.ही पेन्शन शेजारीच्या तीन राज्यात देण्यात आली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अंगावर भिंत कोसळून चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातून आज,सोमवार २४ ऑगस्ट रोजी एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे.अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खामखुरा गावात घरासमोरील अंगणात...

माता व बालक मृत्यू प्रकरणी चौकशी समिती गठीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी येथील प्रसूती प्रकरणात माता व बालकाच्या मृत्यूची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक स्तरावर चौकशी समिती गठीत करण्यात...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयात वाणिज्य विद्यार्थी अभ्यास मंडळाची स्थापना.. – विद्यार्थ्यांनी आत्मनिर्भर बनावे- प्रा.डॉ.निलेश हलामी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डाॅ.श्रीराम गहाणे यांच्या मार्गदर्शनात शैक्षणिक सत्र २०२६-२७ करिता वाणिज्य विद्यार्थी अभ्यास मंडळाची स्थापना...

धावत्या बसमधून खाली कोसळताच दुसऱ्या बसने चिरडले; तरुणीचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-पुण्यातील सिंहगड मार्गावरील माणिकबाग परिसरात आज,सोमवार २४ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली. खानापूर-स्वारगेट मार्गावरील धावत्या पुणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!