Saturday, August 15, 2026
Homeगडचिरोलीजांबिया शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी आवश्यक बेड उपलब्ध; वृत्तातील दाव्यांबाबत प्रशासनाचा खुलासा..

जांबिया शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी आवश्यक बेड उपलब्ध; वृत्तातील दाव्यांबाबत प्रशासनाचा खुलासा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील जांबिया येथील शासकीय आश्रमशाळेबाबत १४ ऑगस्ट रोजी एका दैनिकात प्रसिद्ध झालेल्या वृत्ताच्या अनुषंगाने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, भामरागड यांनी वस्तुस्थिती स्पष्ट केली आहे.सदर शाळेत विद्यार्थ्यांसाठी आवश्यक बेड उपलब्ध असून,शाळेतील पायाभूत सुविधांबाबत वृत्तात नमूद काही बाबी वस्तुस्थितीशी सुसंगत नसल्याचे प्रकल्प अधिकारी अमर राऊत यांनी स्पष्ट केले आहे.जांबिया येथील शासकीय आश्रमशाळा नवीन इमारतीत कार्यरत असून नवीन स्वतंत्र वसतिगृह इमारतीचे बांधकाम सुरू आहे.सध्या मुलांचे वसतिगृह शाळेच्या इमारतीत कार्यरत आहे,तर मुलींचे वसतिगृह नवीन इमारतीत सुरू असल्याचे खुलाशात नमूद करण्यात आले आहे.
शैक्षणिक सत्र २०२६-२७ मध्ये शाळेत इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत ८३ मुले आणि ९४ मुली असे एकूण १७७ विद्यार्थी निवासी आहेत.विद्यार्थ्यांसाठी ९० बंक बेड उपलब्ध असून त्यांची क्षमता १८० विद्यार्थ्यांची आहे.त्यामुळे निवासी विद्यार्थ्यांच्या संख्येच्या तुलनेत पुरेशी बेड व्यवस्था उपलब्ध असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.याची सद्यस्थिती दर्शविणारी छायाचित्रेही प्रशासनाने सादर केली आहे.
शाळेच्या जुन्या इमारतीमध्ये १०० खाटांची मागणी यापूर्वी करण्यात आली होती.मात्र,त्यानंतर नवीन इमारतीत स्थलांतर झाल्यानंतर आवश्यकतेनुसार बंक बेड उपलब्ध करण्यात आले आहेत.त्यामुळे जुन्या मागणीच्या पत्राचा संदर्भ सध्याच्या परिस्थितीशी जोडणे योग्य नसल्याचे खुलाशात स्पष्ट करण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी २ आरओ वॉटर प्युरिफायर बसविण्यात आले असून ते कार्यरत आहेत.शाळेतील अधीक्षकाचे पद रिक्त असल्याने संबंधित जबाबदारी शिक्षकांकडे सोपविण्यात आली आहे.तसेच स्त्री अधीक्षक पदासाठी स्वतंत्र अर्ज मागविण्यात आले असून पात्र उमेदवाराची निवड झाल्यानंतर नियुक्ती करण्यात येणार असल्याचेही प्रशासनाने नमूद केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जिल्हा पोलीस मुख्यालयातर्फे तिरंगा बाईक रॅली; ३०० हून अधिक पोलीस अधिकारी,कर्मचाऱ्यांचा सहभाग..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहात देशभक्तीचा जागर करत जिल्हा पोलीस मुख्यालयातर्फे आज शनिवारी तिरंगा बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले.या रॅलीचे उद्घाटन सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल...

आजपासून पावसाचा जोर वाढणार..

उद्रेक न्युज वृत्त :-विश्रांती घेतलेला पाऊस परत पुन्हा एकदा सक्रिय होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार,आज शनिवार १५ ऑगस्ट...

सर्पदंश दुर्घटनेतील दोन विद्यार्थिनींच्या प्रकृतीत सुधारणा; एका विद्यार्थिनीवर वैद्यकीय उपचार सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील अनुदानित आश्रमशाळेतील सर्पदंशाच्या घटनेनंतर उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या विद्यार्थिनींपैकी कविता किरंगे आणि दीपिका मडावी या दोघींच्या...

संशय आल्याने लाच रक्कम घेण्यास नकार; भूमी अभिलेख कार्यालयाच्या भुकरमापकास एसीबीने घेतले ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-शेतीचे सात-बारे वेगळे करण्यासाठी तब्बल ७५ हजारांच्या लाचेची मागणी करून तडजोडी अंती ३० हजारावर सेटलमेंट झालेली असतांनाच एसीबीच्या पथकाचा संशय बळावल्याने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!