Wednesday, July 29, 2026
Homeकोंढाळाजगात आपली बौद्ध म्हणून ओळख व्हावी….-कोंढाळा येथील धम्म प्रबोधनात डॉ.राजरत्न आंबेडकर यांचे...

जगात आपली बौद्ध म्हणून ओळख व्हावी….-कोंढाळा येथील धम्म प्रबोधनात डॉ.राजरत्न आंबेडकर यांचे प्रतिपादन

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

देसाईगंज(कोंढाळा) :- महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी आपणांस  १९५६  ला बुद्धाच्या धम्माची धम्मदीक्षा दिल्यानंतर आजही आपण जुन्या जातीच्या नावाने दलीत या शब्दात गुरफटून न राहता; आता आपली जगात बौद्ध म्हणून ओळख निर्माण करा; असे प्रतिपादन दि बुद्धिस्ट सोसायटी आँफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.राजरत्न आंबेडकर यांनी केले.

दि बुद्धिस्ट सोसायटी आँफ इंडिया ग्रामशाखा कोंढाळा व डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन संस्था बौद्ध समाज कोंढाळा यांचे वतीने आयोजित धम्म प्रबोधन कार्यक्रमात मुख्य मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.

कार्यक्रमाचे उदघाटन ब्रम्हपूरी येथील सामाजिक विचारवंत प्रा.डॉ.युवराज मेश्राम यांचे हस्ते करण्यात आले.त्यांनी देखिल उदघाटनपर मार्गदर्शन केले. याप्रसंगी अतिथी म्हणून भन्ते सचित्त बोधी, दि बुद्धिस्ट सोसायटी आँफ इंडिया चे राज्याध्यक्ष दिनेश हनुमंते,राज्य संघटक वैभव धबडगे, विभागीय अध्यक्ष विजय बन्सोड, उपाध्यक्ष अशोक इंदूरकर, महिला महासचिव यशोधरा नंदेश्वर, महिला प्रतिनिधी दर्शना शेंडे, विभागीय संघटक प्रा.सुरेंद्र तावाडे, इंजि. नरेश मेश्राम, गांवच्या सरपंच अपर्णा राउत,  नितीन राऊत, देसाईगंज शहर बौद्ध समाज कोअर कमेटीचे अध्यक्ष प्रकाश सांगोळे, सल्लागार अशोक बोदेले, डाकराम वाघमारे, राजरतन मेश्राम, उद्धवराव खोब्रागडे, बुद्धिस्ट सोसायटीचे जिल्हा मुख्य सचिव हंसराज लांडगे,काका गडकरी, राधा नांदगाये, अनिल सोरते,आनंद मेश्राम, रोहीणी सहारे, रमेश रंगारी, नागसेन खोब्रागडे, किशोर साखरे, प्रा.एस.टी.मेश्राम, सुधीर रामटेके आणि सामाजिक कार्यकर्ते जे.बी.लांडगे, मुकुंदा मेश्राम यांनी विचारमंचावर स्थान भूषविले.

कार्यक्रमाची सुरुवात तथागत बुद्ध व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून करण्यात आले.उपस्थित सर्वांचे स्वागत सुमधूर स्वागत गीताने महिला व मुलींनी केले.पिवळा पितांबर-त्यात लोकशाहीची जळ… या लेझीम नृत्याने उपस्थितांचे मन आनंदाने भरून गेले.कार्यक्रमाचे संचालन बुद्धिस्ट सोसायटीच्या विभा उमरे,सुकेशिनी ऊके यांनी, प्रास्ताविक बोद्ध समाजाचे कार्याध्यक्ष नागोराव ऊके तर आभार प्रबोधन संस्थेचे राजेंद्र शेंडे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनिता शेंडे, मंगला शेंडे, तुषार ऊके, प्रशांत मंडपे ,रोशन शेंडे,पल्लवी घुटके,अनिल बनसोड, प्रज्ञा शेंडे ,उत्तरा मेश्राम व बौद्ध समाजाचे उपासक -उपसिका सर्वांनी अथक परिश्रम घेतले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तुकाराम मुंढेंनी शाळा व्यवस्थापनावर सोपवली मोठी जबाबदारी; विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी विविध निर्णय..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या धडक कारवाईचे सत्र सुरू असतांनाच आता अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी...

माझा वाढदिवस-एक झाड उपक्रम; देसाईगंज आदर्श महाविद्यालयाच्या वतीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-पर्यावरण संवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचावा आणि वृक्षारोपणाची सवय प्रत्येकामध्ये रुजावी या उद्देशाने आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,देसाईगंज येथे "माझा वाढदिवस-एक झाड" हा...

राज्यांतर्गत पिकस्पर्धा; आता शेतकऱ्यांना घरबसल्या अर्ज करण्याची सुविधा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील अन्नधान्य,कडधान्य व गळीतधान्य पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी तसेच प्रयोगशील व प्रगतशील शेतकऱ्यांच्या कार्याचा गौरव करून आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने...

राज्य सरकार म्हणतेय; गौण खनिजांच्या अवैध उत्खनन आणि वाहतुकीवर दहापट दंड आकारू.. -चोर खरोखरच चोऱ्या करणे सोडणार काय?

उद्रेक न्युज वृत्त :-गौण खनिजांची चोरी करणे ही काही चोरट्यांसाठी नित्याचीच बाब झाली आहे.काहींना अवैध रेती,मुरूम,दगड,माती व इतर गौण खनिजांची चोरी केल्याशिवाय चैनच पडेनासे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!