Monday, September 14, 2026
Homeगडचिरोलीजंगली हत्तींचा धानोरा तालुक्यात धुडगूस; जिवाच्या आकांताने पळापळी..!

जंगली हत्तींचा धानोरा तालुक्यात धुडगूस; जिवाच्या आकांताने पळापळी..!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-कधी आरमोरी तालुका तर कधी देसाईगंज,गडचिरोली,कुरखेडा व इतर तालुक्यात उच्छाद मांडणाऱ्या जंगली हत्तींनी मोर्चा वळवून आता धानोरा तालुक्यात धुडगूस घालत नागरिकांच्या घरांसह जीवनावश्यक वस्तू व पिकांचे नुकसान केले आहे.झुंडात असलेल्या एका हत्तीने शुक्रवार २५ जुलैच्या रात्री धानोराच्या बेलगावात एंट्री करताच गावातील नागरिक भयभीत होऊन जिवाच्या आकांताने सैरभैर पळू लागले.कुणी घराच्या छतावर चढले तर कुणी आदळून-आपटत गावात ‘हत्ती आला रे’ असे म्हणून धूम ठोकली.हत्तीने पवन इंदलसिंग धालनिया यांच्या घराचे छप्पर पाडले,त्यानंतर महेंद्र प्यारेलाल लेडिया यांच्या घराला लक्ष्य केले.घराजवळ ठेवलेले तांदूळ,बिजाई धानाची नासधूस केली. गावातील शिवराज आणि शिवनाथ गावर,पोलिस पाटील संतोष मालिया यांच्या परसबागेतील केळीच्या बागेतही हत्तीने नुकसान केले.छतावर चढलेल्या नागरिकांनी आरडाओरड केली,तसेच हत्तीच्या दिशेने बॅटरी चमकावून हुसकावण्याचा प्रयत्न केला,पण हत्तीने आपलीच खरी करून मोठ्या प्रमाणावर नागरिकांची नुकसान केली. प्रसंगी गावात हुल्ला पथकाची टीम पोहचताच हत्तीला रात्रीतूनच जंगलात पिटाळून लावले.मात्र,रात्री गावात एंट्री केलेल्या हत्तीने काहीकाळ नागरिकांची झोप उडवून सोडली होती.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पर्यावरणपूरक आणि पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-परंपरेचे जतन आणि पर्यावरणाचे संरक्षण यांचा समतोल साधणे ही सामूहिक जबाबदारी आहे. गणेशोत्सवाचा आनंद घेतांना पर्यावरणाची हानी होणार नाही,याची काळजी घेणे...

अतिवृष्टीग्रस्त कुटुंबीयांना १ लाख ३० हजाराची आर्थिक मदत वितरित.. -भाजपा तालुकाध्यक्ष चांगदेव फाये यांच्या पाठपुराव्याला यश..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-अतिवृष्टीमुळे घर कोसळून नुकसान झालेले कुरखेडा शहराच्या गांधी वार्डातील ज्येष्ठ नागरिक नरेश हडप यांच्या कुटुंबाला प्रशासनाकडून १ लाख ३० हजारांची आर्थिक मदत...

अज्ञात वाहनाच्या धडकेत चितळाचा मृत्यू; तर कुंपणात अडकून बिबट्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्यात एकाच दिवशी वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन वन्य प्राण्यांचा मृत्यू झाल्याने वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील तावशी संभाजीनगर महामार्गावर...

राज्यातील भरती परीक्षा पद्धतीत सुधारणांसाठी सूचना व अभिप्राय समितीसमोर मांडण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्यातील शासकीय भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक,विश्वासार्ह आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी तसेच परीक्षांमधील गैरप्रकारांना प्रभावीपणे प्रतिबंध घालण्यासाठी राज्य शासनाने उच्चस्तरीय समिती गठीत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!