उद्रेक न्युज वृत्त :-छत्तीसगडच्या दंतेवाडा,बिजापूर जिल्ह्यांच्या सीमेला लागून असलेल्या जंगलात काल सोमवारी सकाळपासूनच चकमक सुरू होती. नक्षलवाद्यांना पकडण्यासाठी सुरक्षा दलांनी मोहिम हाती घेतली असता नक्षलवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर डिस्ट्रिक्ट रिझर्व्ह गार्ड (डीआरजी) दलाच्या जवानांनी त्याला प्रत्युत्तर दिले.गोळीबार थांबल्यानंतर घटनास्थळाची तपासणी केली असता तिथे छत्तीसगडच्या बस्तर भागात ४५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आलेली कुख्यात गुम्मदिवेली रेणुका ऊर्फ चैत ऊर्फ सरस्वती ही महिला नक्षलवादी ठार झाल्याची आढळून आली.ती तेलंगणातील वरंगळ येथील मूळ रहिवासी आहे. तिच्याकडून एक रायफल,अन्य काही शस्त्रे,स्फोटके जप्त करण्यात आली.तिला पकडण्यासाठी छत्त्तीसगडमध्ये २५ व तेलंणाम येथे २० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.त्यातच बिजापूर जिल्ह्यातील दोन ठिकाणांहून तेरा नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली.
चकमकी नंतर शोध मोहिमेत आढळून आली कुख्यात महिला नक्षली..
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

