Friday, June 19, 2026
Homeकोंढाळाग्रामपंचायत कोंढाळा तर्फे बांबू लागवडीसह विविध प्रजातींचे वृक्षारोपण...

ग्रामपंचायत कोंढाळा तर्फे बांबू लागवडीसह विविध प्रजातींचे वृक्षारोपण…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कोंढाळा(देसाईगंज):-पर्यावरणाचे संवर्धन व्हावे म्हणून राज्य शासनाच्या वतीने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत बांबू लागवडीस प्रोत्साहन देण्यात येत आहे.पडीक जमीन लागवडीखाली आणून आर्थिक उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध करून देण्यासाठी बांबू लागवडीचे अभियान राबविण्यात येत आहे.या योजनेंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात बांबू लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. रोजगार हमी योजने अंतर्गत ग्रामपंचायतींनाही उद्दिष्ट देण्यात आले आहे.देसाईगंज तालुक्याच्या कोंढाळा ग्रामपंचायतीला १ हजार ३०० बांबू लागवड करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले.त्यानुसार गुरुवार दिनांक-८ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास बांबू लागवडीसह विविध प्रजातींचे वृक्षारोपण स्मशानभूमी परिसरात ग्रामपंचायतीच्या सरपंचा अपर्णा राऊत,उपसरपंच गजानन सेलोटे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
वृक्ष संवर्धन काळाची गरज असल्याने प्रत्येकांनी एक तरी वृक्ष लावणे गरजेचे आहे.केवळ नुसते वृक्ष लावून चालणार नाही तर त्याची जोपासना करणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे.संतांच्या म्हणीप्रमाणे ‘वृक्षवल्ली आम्हां सोयरी वनचरे’ हे ध्यानी-मनी बाळगून आज कोंढाळा ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील स्मशानभूमी परिसरात कडू लिंब,सीताफळ, जांभूळ तसेच विविध प्रजातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली.त्याचबरोबर बांबू लागवड करून पडीक जमीन लागवडीखाली आणली जाणार असल्याचे प्रसंगी सरपंचा अपर्णा राऊत यांनी सांगितले.
बांबू लागवडीसह विविध प्रजातींचे वृक्षारोपण करतेवेळी ग्रामपंचायत सरपंचा अपर्णा राऊत, उपसरपंच गजानन सेलोट,सदस्या भूमेश्र्वरी गुरूनुले,
पोलीस पाटील किरण कुंभलवार,ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका मेघा राऊत,जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक योगेश ढोरे,रोजगार सेवक प्रकाश बेदरे,आरोग्य उपकेंद्राचे कर्मचारी,आशा वर्कर,उमेद बचत गटाच्या महिला वर्ग तसेच गावातील मजूर वर्ग प्रामुख्याने उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागभीड तालुक्यातील गिरगाव येथे आज,शुक्रवार १९ जून रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.आत्माराम दसरू बोरकर...

कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच नक्षली समर्थक पोलिसांच्या तावडीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-तब्बल अकरा वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा नक्षल समर्थक अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला.विशेष म्हणजे,कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच त्यास अटक करण्यात आली.त्याचा शोध...

देसाईगंजात सुगंधित तंबाखूविक्री जोमात; आरमोरीत अवैध सट्टा-पट्टी,तर कुरखेड्यात दारूचा महापूर..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध तालुक्यात अवैध धंद्यांनी डोके वर काढले असून देसाईगंज शहर व तालुक्यात सुगंधित तंबाखूची खुलेआम विक्री,तर आरमोरी शहरापासून ते ग्रामीण...

जीएसटी नंबर मिळवून दिले नं..! आता दहा हजार द्या.. – राज्यकर निरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गलेलठ्ठ पगार असतांना एकदा कां ओवर कमाईची सवय लागली रे लागली,तर मग ज्या टेबलावर कुठलेही काम मोफत जरी होत असेल तरी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!