- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गोंदिया :-शहर तसेच परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीविरोधात पोलिसांनी वेळोवेळी गुन्हे दाखल करून प्रतिबंधक कारवाया केल्या. पण,त्याच्या वागणुकीत जराही सुधारणा झाली नाही. परत,पुन्हा त्याच मार्गावर जाऊन रात्री-अपरात्री हातात घातक शस्त्रे घेऊन गोर गरीब कामगारांसह सर्वसामान्य नागरिकांना धमकावून लुटमार करणे,अवैध शस्त्र बाळगणे,शासकीय सेवकांवर हल्ला करणे व इतर विविध प्रकारची दहशत पसरवून लोकांचे जगणे कठीण करून सोडल्याने गोंदियाचे जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी कठोर निर्णय घेत त्यास ‘धोकादायक व्यक्ती’ ठरवून वाशिम कारागृहात एक वर्ष ठेवण्याचे आदेश निर्गमित केले आहे.संदेश मधुकर खोब्रागडे वय ४५ वर्षे,रा.कुडवा, ता.जि.गोंदिया असे कारवाई करण्यात आलेल्या कुख्यात गुंडाचे नाव असून त्याच्यावर गोंदिया शहर व रामनगर परिसरातील पोलीस ठाण्यात तब्बल १२ गंभीर गुन्हे दाखल आहेत.त्यामुळे महाराष्ट्र प्रतिबंधक कायदा (एम.पी.डी.ए.)अधिनियम १९८१(सुधारीत २०१५) अंतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव जिल्हा पोलिस प्रशासनाने जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला होता.सदरची कारवाई गोंदिया जिल्हा पोलिस अधीक्षक गोरख भामरे,अप्पर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे,उपविभागीय पोलिस अधिकारी रोहिणी बनकर व साहिल झरकर यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.
- Advertisement -

