- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या कमलानगर येथे ईद-ए-मिलादून्नबी दिनाचे औचित्य साधून गरीब नवाज रिलीफ फाऊंडेशन तर्फे महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.सदर शिबिरास रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत शिबिरात ७१ रक्तदात्यांनी रक्तदान करीत एकप्रकारे सामाजिक बांधिलकी जपली आहे.
गरीब नवाज रिलीफ फाऊंडेशन नेहमी समाजोपयोगी उपक्रम राबवित असतात.देशावर येणाऱ्या संकटकाळी गरीब नवाज रिलीफ फाऊंडेशन नेहमी एक पाऊल पुढे घेऊन लोकांची मदत करीत आहेत.
कोरोना महामारीच्या काळात गरीब नवाज फाऊंडेशनच्या वतीने ऑक्सिजन पुरवठा असो किंवा लावारीस मृतदेहांचा अंत्यसंस्कार असो सदर फाऊंडेशनच्या वतीने नेहमी चांगली कामे केली जातात.गरीब नवाज रिलीफ फाऊंडेशनच्या वतीने
या पंढरवड्यात देशात विविध ठिकाणी वृक्षारोपण आणि रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
देसाईगंज या ठिकाणी झालेल्या महारक्तदान शिबिरास डॉ.आशिष कोरेटी,इलियास खान, बुल्ले,हाजी खलील खान,हाजी एजाज खान,फैझान पटेल,वहीद शेख आदी प्रामुख्याने उपस्थितीत होते सदर शिबिराच्या यशस्वीतेसाठी गरीब नवाज रिलीफ फाऊंडेशन चे पदाधिकारी मो.आमिर यासिनी,जाफर शेख,फराज पठाण,शाकिब शेख,गाझी शेख,मोहनीश शेख,अबरार शेख,कलीम मिर्झा,अफझल शेख,आदींनी परिश्रम घेतले.
- Advertisement -

