Sunday, May 31, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोलीच्या युवकांनी साधला तेलंगणा व राजस्थानच्या राज्यपालांशी संवाद...- आदिवासी युवा आदान-प्रदान कार्यक्रम....-...

गडचिरोलीच्या युवकांनी साधला तेलंगणा व राजस्थानच्या राज्यपालांशी संवाद…- आदिवासी युवा आदान-प्रदान कार्यक्रम….- ३३० युवक भारतातील वेगवेगळ्या १४ राज्यांमध्ये देणार भेटी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- नेहरू युवा केंद्र गडचिरोली आणि केंद्रीय रीझर्व पोलीस बल गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १४ व्या आदिवासी युवा आदान- प्रदान कार्यक्रम अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील,  विशेषतः एटापल्ली आणि भामरागड तालुक्यातील एकूण ३३० युवक भारतातील वेगवेगळ्या १४ राज्यांमध्ये भेट देत आहेत.त्याअंतर्गत २० युवकांनी २१ ते २७ फेब्रुवारी दरम्यान हैदराबाद तसेच २० युवकांनी जयपुर येथे भेट दिली.यादरम्यान युवकांना राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्र आणि तेलंगणाचे राज्यपाल तामिलीसाई सौन्दरराजन यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली.

युवकांनी गडचिरोलीतील संस्कृतीचा महत्त्वाचा भाग असलेल्या रेला नृत्याचे सादरीकरण केले.राजस्थान येथे गडचिरोली चमू चा प्रथम तर हैदराबाद येथे तृतीय क्रमांक आला.प्रथम क्रमांकास दहा हजार रुपये व तृतीय क्रमांकास दोन हजार रुपयांचे पारितोषिक माननीय राज्यपाल महोदय यांच्या हस्ते युवकांना प्रदान करण्यात आले.स्पर्धेतील सर्व सहभागी विजेत्यांचे जिल्हाभरातून कौतुक केले जात आहे.

नेहरू युवा केंद्र गडचिरोली आणि केंद्रीय रिजर्व पोलीस बल गडचिरोली आदिवासी युवकांच्या विकासासाठी आणि त्यांचे एकत्रीकरण करण्यासाठी २००६ पासून “आदिवासी युवा आदान-प्रदान कार्यक्रम” आयोजित करत आहे.या कार्यक्रमाचा मुख्य हेतू हा भारतातील विविध राज्यातून आलेल्या युवकांना एकमेकांशी संवाद साधून आपल्या संस्कृतीची देवाण-घेवाण करणे तसेच आदिवासी तरुणांना भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाची जाणीव करून देणे,आदिवासी तरुणांना इतर क्षेत्रात प्रवृत्त करणे हा आहे.कार्यक्रमाच्या प्रमुख उपक्रमांमध्ये घटनात्मक अधिकारी मान्यवर आणि प्रतिष्ठित व्यक्तींसोबत संवाद सत्रे¸पॅनल चर्चा¸ व्याख्यान सत्र¸आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत उपक्रम¸वक्तृत्व स्पर्धा¸कौशल्य विकास¸करिअर मार्गदर्शनाशी संबंधित उद्योग भेटी¸महत्त्वाच्या आणि ऐतिहासिक स्थळांच्या भेटींचा समावेश आहे.

सदर कार्यक्रम घडवून आणणाऱ्यांमध्ये सीआरपीएफ चे उपमहानिरीक्षक जे.एन.मीना त्याचप्रमाणे जिल्हा युवा अधिकारी अमित पुंडे यांचे मुख्य योगदान लाभले असून त्यांनी सर्व विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन केले. ह्या युवकांना प्रवासादरम्यान साथ देण्यासाठी एस्कॉर्ट म्हणून सोबत गेलेले सुखराम,अनिता गौतम,जे. श्रीनिवास राव,कांता कुमारी रॉय यांचे योग्य सहकार्य लाभले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शेतातील विहिरीत पडून वाघाचा मृत्यू; वन विभागात खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम/सिंदेवाही(चंद्रपूर):-ब्रम्हपुरी वन विभागांतर्गत येणाऱ्या सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील डोंगरगाव नियतक्षेत्र अंतर्गत हजारीचक(ता.सिंदेवाही) येथील शेतातील कठडे नसलेल्या विहिरीत पडून एका प्रौढ नर वाघाचा मृत्यू...

उद्यापासून वादळी पावसाचा अंदाज; शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-सध्या राज्यातील हवामानात बदल होण्यास सुरुवात झाली असून उद्या,सोमवार १ जून पासून सुरु होणाऱ्या आठवड्यातील हवामानात अजून बदल होणार आहे.हवामान खात्याने,प्रामुख्याने...

तरुणाने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-एका ३६ वर्षीय विवाहित तरुणाने राहत्या घरीच गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याची घटना आज,रविवार ३१ मे रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा शहरातील...

विवाहित महिलेचा गळा चिरून हत्या करणारा आरोपी अटकेत.. – क्षुल्लकशा कारणावरून हत्या; बालपणापासून होते प्रेमप्रकरण..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या राजुरा तालुक्यातील वेकोलिच्या धोपटाळा कामगार वसाहतीत एका विवाहित महिलेची धारदार शस्त्राने गळा चिरून निघृण हत्या करण्यात आल्याची थरारक घटना शुक्रवार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!