Friday, June 19, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेचे ६ फेब्रुवारीला आयोजन...- स्पर्धा परीक्षेची तयारी...

गडचिरोली येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेचे ६ फेब्रुवारीला आयोजन…- स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

गडचिरोली :- जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती,गडचिरोली व बार्टी,पुणे अंतर्गत स्पर्धा परीक्षा (lBPS,बँक,रेल्वे,एल.आय.सी, पोलीस ) भरतीपुर्व प्रशिक्षण केंद्र,गडचिरोली भारतीय सामाजिक बहुउद्देशिय विकास संस्था,गडचिरोली द्वारे संचालीत यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ६ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ११.३० वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, आय.टी.आय.चौक,एल.आय.सी.रोड गडचिरोली येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे उद्घाटक कुलसचिव,गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली डॉ.अनिल हिरेखन,कार्यक्रमाचे अध्यक्ष उपायुक्त जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती गडचिरोली,देवसुदन धारगावे प्रमुख मार्गदर्शक प्रबंध संपादक रोजगार नौकरी संदर्भ व नाथे पब्लीकेशन प्रा.लि.नागपूर संजय नाथे,माजी सदस्य महाराष्ट्र लोकसेवा आयोग मुंबई दयानंद मेश्राम,उपमुख्य कार्यकारी अधिकारी जि.प.गडचिरोली माणिक चव्हाण उपस्थित राहणार आहेत.

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी त्यांना परीक्षांना समोर जातांना येणाऱ्या अडचणी तसेच मुलाखती संदर्भात असलेल्या समस्या संदर्भात  प्रमुख वक्ते मार्गदर्शन करणार आहेत.स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सदरच्या जिल्हास्तरीय स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन कार्यशाळेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा;असे आवाहन उपायुक्त जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती गडचिरोलीचे देवसुदन धारगावे यांनी केले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच नक्षली समर्थक पोलिसांच्या तावडीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-तब्बल अकरा वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा नक्षल समर्थक अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला.विशेष म्हणजे,कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच त्यास अटक करण्यात आली.त्याचा शोध...

देसाईगंजात सुगंधित तंबाखूविक्री जोमात; आरमोरीत अवैध सट्टा-पट्टी,तर कुरखेड्यात दारूचा महापूर..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध तालुक्यात अवैध धंद्यांनी डोके वर काढले असून देसाईगंज शहर व तालुक्यात सुगंधित तंबाखूची खुलेआम विक्री,तर आरमोरी शहरापासून ते ग्रामीण...

जीएसटी नंबर मिळवून दिले नं..! आता दहा हजार द्या.. – राज्यकर निरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गलेलठ्ठ पगार असतांना एकदा कां ओवर कमाईची सवय लागली रे लागली,तर मग ज्या टेबलावर कुठलेही काम मोफत जरी होत असेल तरी...

स्थानिक उत्पादनांना मिळणार नवी ओळख; गडचिरोली ब्रँडसाठी स्वतंत्र लोगो आणि टॅगलाईन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-स्थानिक उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी स्वतंत्र 'गडचिरोली ब्रँड' विकसित करणे,पर्यटन विकासाला गती देणे,महिला बचत गटांना अधिक सक्षम बनविणे,धान साठवणुकीची क्षमता...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!