Tuesday, June 23, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली येथे जागतिक सिकलसेल दिनी जनजागृती रॅलीचे आयोजन..-जिल्ह्यात ३८,२१७ सिकल सेल वाहक...

गडचिरोली येथे जागतिक सिकलसेल दिनी जनजागृती रॅलीचे आयोजन..-जिल्ह्यात ३८,२१७ सिकल सेल वाहक आणि २,८५३ सिकल सेल ग्रस्त रुग्ण…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :-जागतिक सिकल सेल दिनानिमित्त येत्या १९ जून रोजी गडचिरोली येथे जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.गडचिरोली मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांच्या हस्ते सकाळी ९ वाजता रॅली चे उदघाटन होणार आहे.ही रॅली इंदिरा गांधी चौकातून सुरु होऊन महिला व बाल रुग्णालय गडचिरोली येथे रॅलीची सांगता होणार आहे.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रताप शिंदे,अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ, सतीश सोलंकी यावेळी  उपस्थित  राहणार आहेत. जिल्ह्यात गावोगावी आरोग्य कर्मचारी,आशा स्वयसेविका यांचे मार्फत सिकलसेलवर जनजागृती करण्यात येणार आहे.राष्ट्रीय सिकलसेल निर्मूलन कार्यक्रमा अंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात वर्ष २००९ पासून गावनिहाय,शाळा निहाय आणि इतर स्तरावर लाभार्थ्यांची सिकल सेल आजाराची तपासणी करण्यात येत आहे.सध्या जिल्ह्यात एकूण ३८,२१७ सिकल सेल वाहक आणि २,८५३ सिकल सेल ग्रस्त रुग्ण आहेत.यामध्ये सिकल सेल ग्रस्त रुग्णांचे सिकल सेल क्रायसिस,तीव्र रक्तक्षय व आवश्यक आरोग्य तपासणीसाठी नियमित पाठपुरावा करण्यात येत आहे.

सिकल सेलग्रस्त रुग्णांना क्रायसिस होऊ नये आणि वारंवार रक्त लावण्याची गरज पडू नये म्हणून हैड्रोक्सियूरिया हे औषध सर्व रुग्णांना सुरु करण्याचे ठरविले आहे.सध्या जिल्ह्यात एकूण ९२९ रुग्णांना हैड्रोक्सियूरिया हे औषध सुरु केले असून त्यांच्या आरोग्य उत्कृष्ट असा बदल झाला आहे.याव्यतिरिक्त जिल्ह्यात सर्व गरोदर स्त्रियांची प्रसूतीदरम्यान सिकल सेल तपासणी आणि ज्या स्त्रिया वाहक किवा रुग्ण आढळल्यास त्यांच्या पतींची सुद्धा तपासणी करण्यात येत आहे.जेणेकरून सिकल सेल असलेले जोडप्याचे २० आठवड्याच्या आत गर्भजल चाचणी करून होणाऱ्या आपत्य हे सिकल सेल रुग्ण तर नाही हे जाणून घेता येते व ते जोडप्यांना गर्भपाथासाठी समुपदेशन करून टाळता पण येते.यासाठी जिल्ह्यात संकल्प फौंडेशन आणि क्र्सना दॆग्नोस्टिकस कार्यरत आहेत. 

ऑक्टोबर २०१८ पासून जिल्ह्यात एकूण १५३० गरोदर स्त्रियांची तपासणी करण्यात अली आहे.त्या पैकी ५४ स्त्रिया या सिकल सेल वाहक म्हणुन  व १७ जोडपी हे दोन्ही वाहक असल्याचे आढळले व अश्या सर्व १७ स्त्रियांची गर्भजल चाचणी करण्यात अली आहे.या १७ पैकी ३ स्त्रियांच्या तपासणीत होणारे अपत्य हे सिकल सेल रुग्ण असेल असे आढळून आले आणि त्या पॆकी २ जोडप्यांनाही होणारे अपत्य सिकल रुग्ण होऊ नये व त्यांनी आयुष्यभर यातना सोसू नये म्हणून वैद्यकीयरित्या गर्भपात केले आहे.याच अनुषंगाने जिल्ह्यात नवीन जन्माला येणार बाळ सिकल सेल आहे किवा नाही हे जाणून घेण्यासाठी सर्व आरोग्य संस्थामध्ये सिकल सेल वाहक असलेले जोडप्याची गर्भजल तपासणी सुरु करण्यात येत आहे.

तसेच नवजात बालकाला सिकल सेल आजार तर नाही या साठी शासनाच्या निर्देशानुसार नवजात बालकाचे जन्माच्या ७२ तासामध्ये तपासणी करण्यात येत आहे.ही तपासणी हिंद लॅब मार्फत प्रत्येक आरोग्य संस्था स्तरावर सुरु करण्यात येत आहे.सण २०२३ पासून एकूण ६,२७५ नवजात बालकांची तपासणी करण्यात आली आहे आणि येत्या काळात सर्वच नवजात बालकाची तपासणी प्रत्येक आरोग्य संस्थांवर करण्यात येईल; असे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी सांगितले.तसेच सिकल सेल हे आजार पुढच्या पिढीत होऊ नये म्हणुन लग्नापूर्वी तपासणी आणि दोन सिकल सेल आजाराच्या वाहकांचे लग्न होऊ नये म्हणुन प्रत्येक आरोग्य संस्था स्तरावर आरोग्य कर्मचारी हे समुपदेशन करत आहेत. तसेच सिकलसेल आजार नियंत्रण करण्याकतीता जिल्ह्यात नीती आयोग कडून मुस्कान सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रम जिल्हाधकारी व मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनात सुरु करण्यात आलेले आहे.यात ६ ते १९ वयोगटातील विध्यार्थी ची सिकलसेल तपासणी करून विवाह पूर्व समुपदेशन करण्यात येणार आहे

तसेच उपकेंद्र स्तरावर पेशंट सपोर्ट ग्रुप हे स्थापन करण्यात येत आहे; जेणेकरून सर्व सिकल सेल वाहक आणि रुग्ण व्यक्तीचा नियमित औषधिकरीता , आरोग्य तपासणीसाठी आणि समुपदेशनासाठी पाठपुरावा घेण्यात येईल.जिल्ह्यात सिकलसेल चे नवीन रुग्ण होऊन नये व आहेत त्या रुग्णांना नियमित आरोग्य सेवा मिळावी म्हणून जिल्हा आरोग्य विभाग  तत्पर आहे.हे कार्यक्रम राबविण्यासाठी व कार्यक्रमाच्या सनियंत्रांसाठी ‘पाथ’ ही संस्था आरोग्य विभागासोबत कार्यरत  असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रताप शिंदे यांनी कळविले आहे. 

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाकडून दखल.. – तीन प्रगतशील शेतकऱ्यांना ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील तीन प्रगतशील शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाने दखल घेत सन २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षांसाठीचा प्रतिष्ठेचा 'वसंतराव नाईक शेतीनिष्ठ...

कर्जमाफीसाठी शेतकरी थेट बैलावर बसून पोहचला तहसील कार्यालयात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राज्यातील शेतकरी बांधवांचे २ लाखापर्यंत कर्जमाफ करण्यात येणार आहे; पण शेतकऱ्यांना अद्यापही कर्जमाफी योजनेचा लाभ मिळालेला नाही. कर्जमाफीबाबत प्रशासनाकडून वा संबंधित...

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-एसटी अर्थात राज्य परिवहन महामंडळाच्या  कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे ५३ टक्क्यांवरून ५८ टक्क्यांपर्यंत वाढविण्याची घोषणा आज,मंगळवार २३ जून रोजी...

नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी निर्धारित मुदतीत वार्षिक विवरणपत्र सादर करण्याचे आवाहन.. – अन्यथा दहा हजाराचा दंड..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ पिरिऑडिकल्स (पीआरपी)अधिनियम,२०२३ अंतर्गत नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी आर्थिक वर्ष २०२४-२५ चे लेखापरीक्षित वार्षिक विवरणपत्र प्रेस...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!