Monday, August 31, 2026
Homeगडचिरोलीआता अवैध रेती,मुरूम व इतर उत्खननावर वॉच ठेवणार भरारी पथक…-गडचिरोली जिल्हास्तरीय भरारी...

आता अवैध रेती,मुरूम व इतर उत्खननावर वॉच ठेवणार भरारी पथक…-गडचिरोली जिल्हास्तरीय भरारी पथक गठीत…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- गडचिरोली जिल्ह्यातील नदीपात्रातून व इतर ठिकाणाहून होणाऱ्या अवैध गौण खनिज उत्खननावर आळा घालण्याकरीता व शासकीय महसूलाचे नुकसान टाळण्यासाठी प्रभारी जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी जिल्हास्तरीय भरारी पथकाची नेमणूक केली आहे.

भरारी पथकात तहसिलदार,नायब तहसिलदार, तलाठी आणि महसूल सहाय्यक यांचा समावेश आहे.भरारी पथकाला अवैध गौण खनिज उत्खनन बाबत प्राप्त तक्रारींच्या अनुषंगाने तात्काळ कारवाई करणे,संबंधीत ठिकाणी भेट देवून मौका पंचनामा, जप्तीनामा करणे,उपस्थितांचे जवाब घेणे व उत्खनन झालेल्या ठिकाणाची संबंधीत तालुक्याचे तहसिलदार, उपअधिक्षक भूमी अभिलेख यांचे उपस्थितीमध्ये मोजणी करुन पंचनामे तयार करणे,कारवाईच्या वेळेस आवश्यकता वाटल्यास पोलीस संरक्षण घेणे,केलेल्या कार्यावाहीच्या अनुषंगाने सविस्तर अहवाल अभिप्रायासह व अभिलेख जिल्हाधिकारी यांना तातडीने सादर करणे,प्राप्त तक्रारी व त्यावर केलेल्या कार्यवाहीच्या अनुषंगाने विहित नोंदवहीत नोंदी ठेवणे; आदी जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या असून संपूर्ण कार्यवाही दरम्यान गोपनियता बाळगण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाघाच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील मोहर्ली वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मोहर्ली वनपरिक्षेत्राच्या मोहर्ली बिटातील १५४ कक्ष क्रमांकात...

ई-पीक पाहणी नोंद घेणाऱ्यांकडून पैश्याची मागणी; तहसील कार्यालयात करा तक्रार..

उद्रेक न्युज वृत्त :-शासनाने 'खरीप हंगाम-२०२६' साठी ई-पीक पाहणीच्या कार्यपद्धतीत बदल करून गावनिहाय नियुक्त करण्यात आलेल्या पीक पाहणी सहाय्यकांमार्फत पिकांची नोंद करण्यात येत आहे.विशेष म्हणजे,शासकीय योजना,पीक कर्ज...

पुष्पा स्टाईलने सागवान लाकूड तस्करीचा डाव.. – घेराबंदी घालताच तस्करांनी ठोकली धूम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला 'पुष्पा: द राईज' हा लोकप्रिय चित्रपट सर्वांच्याच लक्षात आहे.आंध्र प्रदेशच्या शेषाचलम जंगलातील लाल...

तब्बल बारा दिवसांपूर्वी आलेल्या धमकीच्या ‘ई-मेल’ ची धास्ती; उद्याला शाळांना सुट्टी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहरातील तब्बल डझनहून अधिक नामांकित शाळांसह १९ ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल मंगळवार १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!