Tuesday, June 23, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली : बारशाच्या कार्यक्रमात बनविलेल्या मांसाहरी जेवणातून २८ जणांना विषबाधा...

गडचिरोली : बारशाच्या कार्यक्रमात बनविलेल्या मांसाहरी जेवणातून २८ जणांना विषबाधा…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :-बारशाच्या कार्यक्रमात बनविलेल्या मांसाहरी जेवणातून २८ जणांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना गडचिरोली जिल्ह्यातील रोपीनगट्टा गावात उघडकीस आली आहे.यामध्ये पाच चिमुकल्यांचा समावेश असून सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यातआले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की,धानोरा तालुक्यातील शेवटच्या टोकावरील छत्तीसगड सीमेवरच्या झाडापापडा ग्रामपंचायत अंतर्गत रोपीनगट्टा येथील सुरगू मुरा टेकाम यांच्या नातीच्या नामकरण विधीचा कार्यक्रम ४ जुलैला आयोजित केला होता.यानिमित्ताने टेकाम परिवाराने खास मांसाहारी जेवणाचा बेत आखला होता.

मात्र,पहिल्या पंगतीत जेवण केलेल्यांना १५ मिनिटांतच उलट्या,मळमळ,डोकेदुखी असा त्रास व्हायला सुरुवात झाली.त्यानंतर एकच गोंधळ उडाला, दुसरी पंगत थांबविण्यात आली.प्रकृती अत्यवस्थ झालेल्या सर्व १८ जणांना पेंढरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले.

तेथे प्रथमोपचार केल्यानंतर २२ जणांना गडचिरोली जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सहा जणांना छत्तीसगड राज्यातील पाखांजूर येथे हलविण्यात आले आहे.यातील तिघांची प्रकृती अत्यवस्थ असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे.या धक्कादायक घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी निर्धारित मुदतीत वार्षिक विवरणपत्र सादर करण्याचे आवाहन.. – अन्यथा दहा हजाराचा दंड..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ पिरिऑडिकल्स (पीआरपी)अधिनियम,२०२३ अंतर्गत नोंदणीकृत सर्व वृत्तपत्र व नियतकालिक प्रकाशकांनी आर्थिक वर्ष २०२४-२५ चे लेखापरीक्षित वार्षिक विवरणपत्र प्रेस...

गॅस सिलेंडर घ्यायचा की मुलांच्या शाळेची फी भरायची?

उद्रेक न्युज वृत्त :-सिलिंडरच्या वाढत्या किमतींमुळे ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांनी गॅस वापरणे बंद करून पुन्हा एकदा पारंपरिक चुलीकडे वळण्यास सुरुवात केली आहे.सिलेंडर घ्यायचा की...

महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक-१७ जागांचा निकाल जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील १७ विधान परिषदेच्या जागांपैकी ६ जागांवर महायुतीने आधीच बिनविरोध विजय मिळवला.अश्यातच आज,सोमवार २२ जून रोजी ११ स्थानिक स्वराज्य संस्था...

राज्यात ३०० कोटी वृक्ष लागवडीसाठी राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी मोहिम.. – गडचिरोलीत वृक्ष लागवडयोग्य जमिनीची प्रत्यक्ष पडताळणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यात ३०० कोटी वृक्ष लागवडीसाठी राज्य शासनाने महत्त्वाकांक्षी मोहिम हाती घेतली आहे.या मोहिमेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात व्यापक वृक्षारोपणासाठी उपलब्ध शासकीय जमिनींची प्रत्यक्ष...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!