Saturday, May 2, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली नाट्यश्री कविता स्पर्धेतील ४९ व्या सत्रात यामिनी मडावी विजयी...

गडचिरोली नाट्यश्री कविता स्पर्धेतील ४९ व्या सत्रात यामिनी मडावी विजयी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-स्थानिक ‘नाट्यश्री साहित्य कला मंच’ गडचिरोलीच्या वतीने आठवड्यातील उत्कृष्ट कवी व कविता हा नविन उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे.त्यानुसार दर आठवड्याला ही स्पर्धा घेण्यात येते.या उपक्रमांतर्गत प्रत्येक कवींनी दर आठवड्याला कविता सादर करायची असून या कवितांमधून फक्त एका कवितेची निवड करण्यात येते.या कवितेला आठवड्याची उत्कृष्ट कविता व कवीला आठवड्याचे उत्कृष्ट कवी म्हणून पुरस्कृत करण्यात येते.व पुरस्कार म्हणून एक पुस्तक व आकर्षक प्रमाणपत्राने गौरविण्यात येते.
या उपक्रमाचे ४९ वे सत्र नुकतेच पार पडले असून यात ३७ कवींनी सहभाग नोंदविला होता.या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून त्यात गडचिरोली येथील कवयित्री सौ.यामिनी मडावी यांची आठवड्याचे उत्कृष्ट कवी व त्यांच्या “माझे गाव” या कवितेची आठवड्याची उत्कृष्ट कविता म्हणून निवड करण्यात आली आहे.असे नाट्यश्रीचे संचालक तथा नाटककार चुडाराम बल्हारपुरे व कविता विभाग प्रमुख योगेश गोहणे यांनी कळविले आहे.
यामिनी मडावी या गडचिरोली येथील आदिवासी कवयित्री असून त्यांनी अनेक कवितांचे लेखन केले आहे.नाट्यश्रीच्या वतीने प्रकाशित होणाऱ्या ‘जोडीदार’ या प्रातिनिधिक कवितासंग्रहात त्यांच्या कवितांचा समावेश आहे.त्यांना सामाजिक कार्याची आवड आहे.
त्यांच्या या यशाबद्दल नाट्यश्रीचे प्रा.‌अरुण बुरे,दादा चुधरी,दिलीप मेश्राम,प्रा.यादव गहाणे तसेच नाट्यश्री च्या सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
या ४९ व्या सत्राच्या स्पर्धेत प्रामुख्याने रोहिणी पराडकर,पी.डी.काटकर,प्रा.पंढरी बनसोडे,प्रभाकर दुर्गे,पुनाजी कोटरंगे,स्वप्नील बांबोळे,संतोष कपाले, प्रेमिला अलोने,संगीता ठलाल,विलास टिकले,वंदना सोरते,तुळशीराम उंदीरवाडे, संगीता रामटेके,सुभाष धाराशिवकर,सुरज गोरंतवार,मुर्लीधर खोटेले, उकंडराव नारायण राऊत,गणेश रामदास निकम,डॉ. मंदा पडवेकर,नरेंद्र गुंडेली,वामनदादा गेडाम,संजय बन्सल,सोनाली रायपुरे-सहारे,रेखा दिक्षित,कृष्णा कुंभारे,ज्योत्स्ना बन्सोड,मधुकर दुफारे,शैला चिमड्यालवार,पुरुषोत्तम दहिकर,यामिनी मडावी,पांडुरंग मुंजाळ,सुनिल चडगुलवार,सुजाता अवचट,खुशाल म्हशाखेत्री,जयराम धोंगडे,कु. मंदाकिनी चरडे इत्यादी कवींनी सहभाग नोंदविला होता.
या पुरस्काराचे वितरण नाट्यश्रीच्या पुढील कार्यक्रमात करण्यात येणार आहे; असे नाट्यश्रीचे संचालक तथा नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांनी कळविले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; यंदाही मुलींनीच मारली बाजी..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या फेब्रुवारी- मार्च-२०२६ बारावी परीक्षेचा निकाल आज,शनिवार २ मे जाहीर करण्यात...

येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या नावात आईचे नाव अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-आईच्या योगदानाला विशेष सन्मान देण्यासाठी,लिंग समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सामाजिक समतोल राखण्यासाठी आता महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या ओळखीच्या पद्धतीत महत्त्वपूर्ण बदल...

सहपालकमंत्र्यांच्या हस्ते बचत गटाच्या सहा महिला प्रभागसंघांना फिरत्या रेस्टॉरंटचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील ग्रामीण महिलांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांना सन्मानाने जगण्यासाठी 'उमेद' अभियान आणि जिल्हा प्रशासनाने एक अभिनव पाऊल उचलले आहे.महाराष्ट्र दिनाचे औचित्य...

माय-लेकीने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बाळ जन्माला येताच मृत पावल्याने धक्क्यातून सावरण्यासाठी आईकडे राहायला गेलेल्या मुलीने आणि तिच्या आईने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!