Monday, July 27, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्ह्यातील ८९ पूरपीडित नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले…-उद्याला सर्व शाळांना तसेच औद्यागिक संस्थांना...

गडचिरोली जिल्ह्यातील ८९ पूरपीडित नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले…-उद्याला सर्व शाळांना तसेच औद्यागिक संस्थांना सुट्टी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- जिल्ह्यात गत तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे काही भागात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाद्वारे कोटगल बॅरेज येथील ७० नागरिकांना व पारडी येथील १९ नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे.शासनाद्वारे जिल्ह्यातील विविध भागात सुसज्ज शेल्टर होम तयार असून आवश्यकतेनुसार या शेल्टर होम मध्ये नागरिकांनी आश्रय घ्यावा,असे आवाहन जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केले आहे.

जिल्हा प्रशासन पूरग्रस्तांच्या मदतीला असून पावसामुळे घरांचे नुकसान झालेल्या नागरिकांना तसेच पुरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढून स्थलांतरीत करण्यात येत आहे. शेल्टर होम मध्ये नागरिकांकरिता  राहण्याची व भोजनाची व्यवस्था करण्यात आली असून त्यांची योग्य काळजी घेण्यात येत आहे. शेल्टर होम व्यवस्थापन, बाधित रस्ते/पुल, बॅरेकेडींग,पर्यंटन,कम्युनिकेशन प्लॅन,बचाव पथके,संसाधन सुसज्जता,राशन व औषध उपलब्धता, विशेषतः गर्भवती मातांची काळजी इत्यादी संदर्भाने दक्षता घेण्याबाबत यंत्रणेला निर्देश देण्यात आले असून मागील ७२ तासात पावसामुळे झालेल्या घरांचे नुकसान तसेच शेती नुकसानीचे पंचनामे करण्याचे  निर्देशही जिल्हाधिकारी दैने यांनी दिले आहेत. 

दरम्यान मौजा- कोंढाळा,ता.देसाईगंज येथील कु.वंश विजय भुते,वय ८ वर्षे या बालकांचा घराजवळील तलावात बुडून मृत्यु झाला आहे.

बचाव कार्यासाठी सिरोंचा,भामरागड व गडचिरोली या तालुक्याच्या ठिकाणी एसडीआरएफ च्या प्रत्येक एक असे ३ तुकड्या तैनात करण्यात आलेल्या आहेत.

गडचिरोली मुख्यालयी रात्रौ ८ ते पहाटे ३ पर्यंत १९८ मि.मी.एवढे मुसळधार अतिवृष्टी झाली आहे. सायंकाळपर्यंत शहरातील बहुतांश भागात पाण्याचा निचरा झालेला असून परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. भामरागड तालुका मुख्यालयी पर्लकोटाचे पाणी सध्या ओसरणे सुरु आहे.स्थानिक नागरिकांना यापूर्वीच एसएमएस,दवंडी,पब्लिक ॲड्रेस सिस्टीमद्वारे संभाव्य पूरपरिस्थितीबाबत अलर्ट देण्यात आले आहे. 

 नागरिकांनी पूर परिस्थितीत योग्य काळजी घ्यावी. तसेच विनाकारण बाहेर पडू नये,पुलावरून पाणी वाहत असताना पुढे जाऊ नये,असे आवाहन जिल्हाधिकारी संजय दैने  यांनी केले आहे. 

उद्याला शाळेला सुट्टी👇

मागील ३ दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊसासह अतिवृष्टी झालेली असून वैनगंगा,गोदावरी,प्राणहिता,बांडिया,इंद्रावती इ. नद्यांच्या पाण्याची पातळी ही वाढत असून सदर पाणलोट क्षेत्रातील नद्या व नाल्यांना पूर आल्याने ३७ मार्ग बंद आहे.शिवाय गोसेखुर्द धरणातून सध्या सुरु असलेले विसर्ग वाढविण्याची दाट शक्यता असल्याने जिल्हाधिकारी संजय दैने यांनी गडचिरोली  जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,सर्व सरकारी व खाजगी

प्राथमिक व माध्यमिक शाळा,जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका शाळा,अनुदानित व विना अनुदानित शाळा,सर्व आश्रमशाळा,सर्व महाविद्यालये व आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षण केंद्र यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्था,औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेतेच्या दृष्टीकोनातून संपूर्ण गडचिरोली जिल्हा सीमाक्षेत्रामध्ये दिनांक- २२ जुलै, २०२४,सोमवार रोजी सुट्टी जाहीर करीत असल्याचे आदेश निर्गमित केले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाघोबाची दहशत; तब्बल दहा गावात ‘हाय अलर्ट’..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या सेलू,वर्धा व इतर तालुक्यातील परिसरात तीन वर्षे वयोगटातील तरुण नर वाघोबाची भ्रमंती सुरू असल्याने तब्बल दहा गावात वन विभागाच्या वतीने...

पुढील दोन दिवस पावसाचे; तर आज सात जिल्ह्यात वादळी पाऊस..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-पूर्वी उन्हाळा,पावसाळा व हिवाळा ठरलेल्या मोसमातील महिन्यांतच 'मी आलोय' म्हणायचा.मात्र, गेल्या काही कालावधीपासून नैसर्गिक चक्राच्या बदलांमुळे ऐन पावसाळ्यात पाऊस कधी पडणार...

तरुणाईचा धसका..! पेपरफुटीवर कठोरता आणण्यासाठी आज सादर होणार परीक्षा सुधारणा विधेयक..

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या दिल्लीत संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून देशभरातील विद्यार्थ्यांची नाराजी दूर करण्यासाठी केंद्र सरकारने शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासोबतच राष्ट्रीय परीक्षा...

पट्टेदार वाघाची दहशत कायम; गर्भार गायीला केले ठार..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-दहा दिवसांपूर्वीच पट्टेदार वाघाने एका  म्हशीवर हल्ला करून ठार केल्याची घटना ताजी असतांनाच आता पुन्हा एका गर्भार गायीवर पट्टेदार वाघाने हल्ला...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!