Monday, September 21, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्ह्यात १४४ कलम लागु….

गडचिरोली जिल्ह्यात १४४ कलम लागु….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- भारत निवडणूक आयोगाने दिनांक-१६ मार्च,२०२४ रोजीच्या प्रसिध्दीपत्रकान्वये लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ चा कार्यक्रम घोषित केला आहे.त्यानुसार गडचिरोली-चिमुर (अ.ज.) लोकसभा मतदार संघ,सार्वत्रिक निवडणूक-२०२४ करिता मतदान दिनांक- १९ एप्रिल, २०२४ रोजी व मतमोजणी दिनांक-४ जुन,२०२४ रोजी आहे.सदर निवडणूक खुल्या व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी मतदान प्रक्रिया व मतमोजणी शांततेत पार पाडणे आवश्यक असल्याने सदर निवडणूक कालावधीत सार्वजनिक अथवा खाजगी मालमत्तेस क्षती पोहचण्यास अथवा मानवी जिविताला, आरोग्याला किंवा सुरक्षिततेला संकट उत्पन्न होण्यास अथवा प्रशांतता बिघडवण्यास अथवा दंग्यास किंवा दंगलीस प्रतिबंध करण्यासाठी या आदेशाद्वारे निर्देश देणे आवश्यक आहे असे मत झाले आहे. 

 जिल्हादंडाधिकारी,गडचिरोली, संजय दैने यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन पुढील प्रतिबंधात्मक आदेश जारी करीत आहे.

मतदान व मतमोजणी केंद्राचे परिसरात प्रवेश करतेवेळी पाच पेक्षा जास्त व्यक्ती (संबंधित अधिकारी व कर्मचारी वगळून) एकत्रितरित्या प्रवेश करणार नाहीत.कोणत्याही प्रकारच्या घोषणा देता येणार नाहीत.मतदान व मतमोजणी केंद्राचे परिसरात उमेदवार,त्यांचे प्रतिनिधी अथवा अन्य व्यक्तीकडून शांततेस बाधा निर्माण होईल असे कृत्य करता येणार नाही.मतदान व मतमोजणी केंद्राचे परिसरात मोबाईल फोन घेऊन प्रवेश करण्यास व निषिध्द वस्तु बाळगण्यास मनाई असेल.मतदान व मतमोजणी सुरळीतपणे व शांततेच्या वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी कोणतीही बाधा उत्पन्न करता येणार नाही.मतदान व मतमोजणी केंद्रावर कोणत्याही अनाधिकृत व्यक्तीस / वाहनास प्रवेशास मनाई राहिल.सदर आदेश पुढील दिनांक व कालावधी करितालागू/अंमलात राहील.मतदान / संबंधित मतदान केंद्रावर दिनांक-१९ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ७ ते ३ वा.पर्यंत, मतमोजणी / मतमोजणीचे ठिकाणी दिनांक- ४ जुन २०२४ रोजी सकाळी ७ ते निकाल घोषित करेपर्यंत आदेशाचा अंमल राहील. सदर आदेश आज दिनांक- ४ एप्रिल २०२४ रोजी  जिल्हादंडाधिकारी,गडचिरोली यांच्या  सही व शिक्कानिशी निर्गमित करण्यात आले.या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या विरुध्द कायद्यातील तरतुदीनुसार योग्य कार्यवाही करण्यात येईल.असे जिल्हादंडाधिकारी,गडचिरोली संजय दैने यांनी कळविले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महाराष्ट्र शासनाच्या वतीने गडचिरोलीत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गणेशोत्सवाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग,सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि जिल्हा प्रशासन,गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या,मंगळवार २२ सप्टेंबर २०२६ रोजी...

भरधाव ट्रकची कारला मागून जोरदार धडक; दोघांचा करुण अंत,तर पाच जण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यातील कोरधा गावाजवळ एक अत्यंत भीषण अपघाताची घटना समोर आली आहे.गावाकडे परत निघालेल्या कुटुंबीयांच्या कारला भरधाव ट्रकने मागून जोरदार...

क्षुल्लकशा कारणावरून बाप-लेकात वाद; बेदम मारहाणीत बापाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-अगदी क्षुल्लकशा कारणावरून बाप-लेकात वाद झाला खरी,पण रागाच्या भरात ३० वर्षीय मुलाने  वडिलांना काठीने बेदम मारहाण केल्याने मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या...

चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात; तीन जणांचा मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-मुंबईतील कोस्टल मार्गावर आज,रविवार २०  सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाला.मरीन ड्राईव्हकडून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!