Sunday, September 6, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्ह्यात जागतिक योग दिन उत्साहात साजरा..

गडचिरोली जिल्ह्यात जागतिक योग दिन उत्साहात साजरा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-योगामुळे केवळ शारीरिक आरोग्य नव्हे, तर मानसिक स्थैर्य आणि शांततेचा अनुभव येतो. सोशल मीडियाचा अतिरेक,वेगवान जीवनशैली आणि इतर कारणांमुळे येणाऱ्या तणावावर मात करण्यासाठी योग हे अत्यंत प्रभावी साधन आहे.मात्र,योगाचा खरा लाभ मिळवायचा असेल,तर तो आपल्या दैनंदिन जीवनशैलीचा भाग बनवा,असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आज,शनिवार २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त केले.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे मुख्य योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.प्रशांत बोकारे होते. या प्रसंगी प्र-कुलगुरु श्रीराम कावळे,कुलसचिव डॉ.अनिल हिरेखण,जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे आदी मान्यवर उपस्थित होते.योग प्रशिक्षक अंजली कुळमेथे आणि मिलिंद उमरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थितांनी योगासने आणि प्राणायामाचे प्रात्यक्षिक केले. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने झाला.जिल्हा प्रशासनाच्या वतीने मुख्य कार्यक्रम विद्यापीठात आयोजित करण्यात आला होता.त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेच्या प्रांगणात स्वतंत्र कार्यक्रम घेण्यात आला. आरमोरी येथे झालेल्या कार्यक्रमास आमदार रामदास मसराम आणि माजी आमदार कृष्णा गजबे उपस्थित होते.एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय एटापल्ली येथे प्रकल्प अधिकारी नमन गोयल यांच्या उपस्थितीत योग दिन साजरा करण्यात आला.तसेच अहेरी,देसाईगंज, कुरखेडा,कोरची,विविध शाळांमध्ये तसेच योग संस्था आणि मंडळांच्या माध्यमातूनही जिल्ह्यात ठिकठिकाणी योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.विद्यापीठात आयोजित कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा.सविता साधमवार यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  क्रीडा व विद्यापीठ प्रशासनातील एस.बी.बडकेलवार,घनश्याम वरारकर,चंद्रशेखर मेश्राम,नाजुक उईके,कुणाल मानकर,सुनील चंद्रे यांनी विशेष प्रयत्न केले. जिल्ह्यातील नागरिक,खेळाडू, योगप्रेमी,विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने योग दिनाच्या उत्साहात सहभाग नोंदविला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

तलावात मासे पकडत असतांनाच पाय घसरल्याने तलावात पडला; चिमुकल्याचा तलावात बुडून मृत्यू.. -दुसऱ्या घटनेत भारतीय सैन्य दलातील जवानाचा पाण्यात बुडून मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील निलज गावातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. शाळेला सुट्टी असल्याने मित्रांसोबत गाव नजीकच्या तलावात मासे पकडण्यासाठी गेलेल्या...

गांजाची वाहतूक; तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त,दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर-बामणी मार्गावर सापळा रचून पोलिसांनी ओडिशातून आणलेला तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त केला.कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले...

शिक्षक दिन व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात.. -शिष्यवृत्ती परीक्षेत देसाईगंज नगर परिषद शाळेचे १४ विद्यार्थी पात्र..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षकांच्या कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी सोहळा आज,शनिवार ५ सप्टेंबर रोजी नगर परिषद देसाईगंजच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!