Wednesday, September 9, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजूर निधीचा वापर कोणत्या कामांवर झाल्याचा तपशील सादर करण्याचे निर्देश..

गडचिरोली जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजूर निधीचा वापर कोणत्या कामांवर झाल्याचा तपशील सादर करण्याचे निर्देश..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेला निधी वेळेत व नियोजनबद्ध पद्धतीने खर्च करणे अत्यावश्यक असून,निधी अखर्चित राहिल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर याची जबाबदारी निश्चित करण्यात येईल,असा इशारा जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिला.जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत प्रशासकीय मान्यता देण्यात आलेल्या कामांच्या खर्चाचा आढावा घेण्यासाठी जिल्हा नियोजन सभागृह,गडचिरोली येथे आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी पंडा बोलत होते.यावेळी विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
बैठकीदरम्यान जिल्हाधिकारी पंडा यांनी विभागनिहाय निधी वितरण व खर्चाचा सविस्तर आढावा घेतला.ज्या विभागांनी मोठ्या प्रमाणात निधीची मागणी केली होती, परंतु प्रत्यक्षात खर्च अल्प प्रमाणात झाल्याचे निदर्शनास आले,त्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. मंजूर निधीचा योग्य वापर करून मार्च अखेरपर्यंत संपूर्ण निधी खर्च करण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी,असे निर्देश त्यांनी संबंधित विभागांना दिले.
तसेच जिल्हाधिकारी यांनी प्रत्येक विभागाने मंजूर निधीचा वापर कोणत्या कामांवर व कोणत्या टप्प्यावर झाला आहे,याचा तपशील सादर करण्याचे निर्देश दिले. मार्च अखेरपर्यंत निधी खर्चाचे उद्दिष्ट पूर्ण होईल याची खात्री करण्यासाठी विभागनिहाय प्रगतीचा सतत आढावा घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी यांना सर्व विभागांना मंजूर निधीचे संपूर्ण वितरण झाले आहे की नाही,याची पडताळणी करण्याचे निर्देश देण्यात आले.तसेच ज्या विभागांनी अपेक्षेप्रमाणे निधी खर्च केलेला नाही,अशा विभागांना लेखी पत्राद्वारे कारणे विचारण्याची कार्यवाही करावी,असेही त्यांनी सांगितले.बैठकीत जिल्हाधिकारी पंडा यांनी स्पष्ट केले की,काम अपूर्ण असल्याचे कारण देऊन निधी खर्च न करणाऱ्या विभागांना पुढील आर्थिक वर्षात निधी वितरणात मर्यादा येऊ शकतात.त्यामुळे सर्व विभागांनी कामांची गती वाढवून मंजूर निधी वेळेत खर्च करावा,असे आवाहन त्यांनी केले.यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी प्रसाद घाडगे यांनी विभागनिहाय माहितीचे सादरीकरण केले.बैठकीला संबंधित यंत्रणेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आत्मसमर्पित नक्षल भुपतींच्या नियुक्तीसंदर्भात कुलगुरूंचे स्पष्टीकरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-आत्मसमर्पित नक्षल वेणूगोपालराव ऊर्फ भुपती यांच्या गोंडवाना विद्यापीठातील एकल ग्रामसभा प्रशिक्षण केंद्रात समन्वयक म्हणून झालेल्या नियुक्तीसंदर्भात प्रसिद्ध झालेल्या वृत्तांच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाचे...

शालेय शिक्षण मंत्री गडचिरोली जिल्हा दौऱ्यावर.. – ‘चला शाळेत जाऊया’ अभियानाच्या अंमलबजावणीचा घेणार आढावा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे हे उद्या,बुधवार ९ सप्टेंबर व १० सप्टेंबर २०२६ रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून,या दौऱ्यात...

मोबाईल व्यसनातून मुक्तीचा जागर-विद्यार्थ्यांना प्रभावी मार्गदर्शन.. – नैनपूरच्या महात्मा गांधी नगर परिषद उच्च प्राथमिक शाळेत मार्गदर्शन वर्गाचे आयोजन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-मोबाईलचा वाढता वापर आणि त्यातून निर्माण होणारे व्यसन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्या शारीरिक,मानसिक व सामाजिक विकासावर परिणाम करू शकते.या पार्श्वभूमीवर आज,मंगळवार ८...

चंद्रपूर जिल्ह्यातील तरुणाचा गडचिरोली जिल्ह्यात खून..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातून एक खळबळ उडवणारी घटना उघडकीस आली आहे.  एका ३४ वर्षीय तरुणाच्या डोक्यात अज्ञाताने तीक्ष्ण हत्याराने वार करून हत्या केल्याची घटना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!