- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गोंदिया :-गोरेगाव-गोंदिया राष्ट्रीय महामार्गावरील राखेचा प्रश्न आता नागरिकांसाठी धोकादायक बनत चालला आहे.येथे किरसान इंटरनॅशनल स्कूलसमोरच राइस मीलमधून निघणाऱ्या राखेचा साठा करीत असून राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या डोळ्यात राख उडत आहे.दररोज शेकडो नागरिकांना या समस्येला सामोरे जावे लागत आहे.
एवढेच नव्हे तर किरसान इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे.या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देत तुमखेडा ग्रामपंचायतीने राइस मील मालकांना नोटीस बजावली.यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडेही तक्रार करणार असल्याचे ग्रामपंचायत प्रशासनाने सांगितले.गोरेगाव तालुक्यातील गणखैरा गावाच्या हद्दीत किरसान इंटरनॅशनल स्कूलसमोर राइस मीलमधून निघणारी राख वर्षानुवर्षांपासून टाकण्यात येत आहे.त्यामुळे त्याठिकाणी राखेचे छोटे डोंगर तयार झाले आहेत. मोठ्या प्रमाणात राख हवेत उडून नागरिकांच्या डोळ्यांत जात असल्याने अपघातांचे प्रमाणदेखील वाढले आहेत.
त्यासमोरच गडचिरोलीचे-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार नामदेव किरसान यांच्या मालकीची किरसान इंटरनॅशनल शाळा आहे.या शाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्यावरदेखील राखेमुळे परिणाम होत आहे. याबाबत अनेकदा राइस मील मालकांना तोंडी सांगण्यात आले.मात्र,राख टाकण्याचे काम आताही सुरूच आहे.या समस्येबाबत नुकतेच ग्रामपंचायत गणखैरा यांनी सर्व गिरणी मालकांना नोटीस बजावली असून या समस्येबाबत गोरेगाव तहसीलदारांनाही कळविले आहे.ही समस्या दूर न झाल्यास ग्रामपंचायत गणखैरा प्रशासनाने जिल्हाधिकाऱ्यांचे दार ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे.
- Advertisement -

