Saturday, June 20, 2026
Homeनागपूरखतरनाक कारनामा..! नीट परीक्षेच्या विद्यार्थ्याला चक्क परदेशातील दिले परीक्षा केंद्र..

खतरनाक कारनामा..! नीट परीक्षेच्या विद्यार्थ्याला चक्क परदेशातील दिले परीक्षा केंद्र..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-काही कालावधीपासून पेपरफुटी तसेच शिक्षणाच्या आयचा घो होत असल्याने होतकरू विद्यार्थ्यांचे उज्वल भवितव्य धोक्यात येऊ लागले आहे.पालक वर्ग आपली मुले शिकून मोठी व्हावीत म्हणून कुठलाही प्रसंग आडकाठी येऊ नये यासाठी जीवाचे रान करून शिक्षण देण्याचा प्रयत्न करतात. पण,सिस्टमच लालसेने भरलेला असेल तर.. सर्वसामान्यांची काय केवा?अश्यातच वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या ‘नीट यूजी-२०२६'(NEET-UG)ची परीक्षा ३ मे २०२६ रोजी २२ लाखांहून अधिकच्या विद्यार्थ्यांनी दिली होती. मात्र,परीक्षेतील पेपरफुटीच्या संशयावरून १२ मे २०२६ रोजी परीक्षा रद्द करण्याचा मोठा निर्णय प्रशासनाला घ्यावा लागला.त्यानुसार,राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने(NTA) वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या ‘नीट यूजी-२०२६’ परीक्षेच्या नव्या तारखेची अधिकृत घोषणा केली आणि पुर्नपरीक्षा उद्या,रविवार २१ जून २०२६ रोजी पार पडणार आहे खरी,पण परीक्षेच्या पूर्वीच
नागपुरातील एका विद्यार्थ्याच्या बाबतीत नॅशनल टेस्टिंग एजन्सीचा(एनटीए)एक खतरनाक कारनामा उघडकीस आला आहे.एनटीए परदेशातील विद्यार्थ्यांसाठी परदेशी केंद्र देते.पण देशातील विद्यार्थ्याला थेट परदेशातील परीक्षा केंद्र दिल्याने पालक आणि विद्यार्थ्याची भंबेरी उडाली आहे.नीट पेपरफुटीच्या वादळानंतर परीक्षा अत्यंत पारदर्शक आणि काळजीपूर्वक घेतली जात असल्याचा केंद्र सरकारचा दावा फोल ठरला आहे.
विशेष म्हणजे,राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या ढिसाळ कारभारामुळे नागपूरच्या ‘अब्दुल्लाह’ नावाच्या परीक्षार्थी विद्यार्थ्याला उद्या,रविवार २१ जून रोजी होणाऱ्या नीट फेरपरीक्षेसाठी थेट संयुक्त अरब अमिरात या देशातील अबूधाबी(यूएई)येथील परीक्षा केंद्र देण्यात आले आहे. परीक्षा अवघ्या एका दिवसावर आली असतांना थेट घडलेल्या या प्रकारामुळे विद्यार्थी आणि पालक प्रचंड चिंतेत आहेत.यापूर्वी त्याला नागपूरमध्येच केंद्र मिळाले होते.अब्दुल्लाहने अर्जात परीक्षा केंद्रासाठी नागपूर,वर्धा आणि भंडारा हे स्थानिक पर्याय निवडले होते.मात्र, एनटीएने या सर्व पर्यायांना केराची टोपली दाखवत त्याला थेट परदेशातील केंद्र दिले.या गोंधळानंतर पालकांनी तातडीने एनटीएच्या हेल्पलाइनवर तक्रार नोंदवली. अधिकाऱ्यांनी आपली तांत्रिक चूक मान्य केली असून, पडताळणीअंती आज सुधारित प्रवेशपत्र देण्यात येईल,असे आश्वासन दिले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तीन तिघडा अन् काम बिघडा..! वन परिक्षेत्र अधिकारी,वनरक्षक व खाजगी इसम एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त गडचिरोली :-अनेकांना वाटतेय की,एखाद्या तिसऱ्याच व्यक्तींच्या माध्यमातून पैश्याची रक्कम घेतली,तर आपले नाव वा आपली करणी उजेडात येणार नाही.पण,लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तसला...

गडचिरोली जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामांमुळे लक्षणीय पाणीसाठा निर्माण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात मागील दोन वर्षांत विविध योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत.या कामांमुळे जिल्ह्यात लक्षणीय पाणीसाठा निर्माण झाला असून...

आता भाडेपट्ट्यावरील शासकीय जमिनींच्या अधिकार अभिलेखात असणार ‘महाराष्ट्र शासन’ कब्जेदार..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील भाडेपट्ट्याने प्रदान करण्यात आलेल्या शासकीय जमिनींच्या अधिकार अभिलेखातील नोंदी अधिक अचूक,पारदर्शक आणि एकसमान करण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.मुख्यमंत्री...

वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागभीड तालुक्यातील गिरगाव येथे आज,शुक्रवार १९ जून रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.आत्माराम दसरू बोरकर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!