Thursday, June 4, 2026
Homeगडचिरोलीखत विक्रेत्यांनी जादा दर आकारल्यास तालुका कृषि अधिकारी कार्यालयात करा लेखी तक्रार..

खत विक्रेत्यांनी जादा दर आकारल्यास तालुका कृषि अधिकारी कार्यालयात करा लेखी तक्रार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यात भात पिकाच्या रोवणीला सुरवात झाल्याने शेतकऱ्यांकडून खते खरेदी सुरु झाली आहे.जिल्ह्यातील शेतकऱ्यांना योग्य पद्धतीने वितरण व्हावे व शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी कृषि विभागाकडून जिल्ह्यात भरारी पथक तयार करण्यात आले असून प्रत्येक तालुक्यात एक पूर्णवेळ गुणनियंत्रण निरीक्षकाची शासनातर्फे नियुक्ती करण्यात आली आहे.शेतकऱ्यांनी खतेखरेदी करतांना दक्षता घेणे आवश्यक आहे.अधिकृत विक्रेत्यांकडून पक्क्या पावतीसह खतेखरेदी करावीत.पावतीवरील संपूर्ण तपशील तपासून घ्यावा. विक्रेत्यांनी ज्यादा दर आकारल्यास तालुका कृषि अधिकारी कार्यालय येथील तक्रार निवारण कक्षात लेखी स्वरुपात तक्रार करावी.जिल्ह्यामध्ये संतुलित खत पुरवठा करण्यासाठी कृषि विभाग प्रयत्न करत आहे.त्यानुसार जिल्ह्यात सध्यस्थितीत इफको २०:२०:०:१३ १७८५ मे.टन, नर्मदा २०:२०:०:१३ १००० मे टन,कोरोमंडल २०:२०:०:१३ ७०० मे टन, इफको डीएपी ९१८ मे.टन,एनएफएल युरिया ६०० मे.टन इत्यादी खतांच्या रेक लागत असून त्याचे नियोजन जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या महसूल मंडळनिहाय करण्यात आले असून रेक पॉईंटवर जिल्ह्यातील कृषि विभागाचे अधिकारी यांचे नियंत्रण जिल्हाधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली ठेवण्यात येत असल्याचे जिल्हा परिषदेच्या कृषि विकास अधिकारी किरण खोमणे यांनी कळविले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

डिझेलचा टँकर पलटी होताच इंधन नेण्यासाठी लोकांची झुंबड..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-आधीच इंधन कमतरतेमुळे पेट्रोल पंपावर गर्दी होतांना दिसून येते.अश्यातच एखाद्या घटनेत चक्क इंधनाचा टँकर पलटी होऊन डिझेलचा महापूर होत असल्याची बाब...

तूर प्रमाणित बियाणे वितरण घटकाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवरील ‘शेतकरी योजना’ या उपक्रमांतर्गत कडधान्य आत्मनिर्भरता अभियान सन २०२६-२७ अंतर्गत तूर प्रमाणित बियाणे वितरण घटकाचा लाभ घेण्यासाठी...

गोदाम बांधकाम,तेल काढणी युनिट,कडधान्य प्रक्रिया व पॅकेजिंग युनिटसाठी लाखो रुपयांपर्यंत अनुदान.. – बना स्वतःच मालक; ऑफलाईन अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील भुईमूग,करडई,तीळ यांसारख्या तेलबिया पिकांचे तसेच तूर,हरभरा व इतर कडधान्यांचे उत्पादन वाढविण्यासोबतच त्यांचे मूल्यवर्धन आणि शेतकऱ्यांना अधिक आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी...

शाळेची पहिली घंटा वाजणार ‘या’ दिवशी..!

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील वाढती उष्णता लक्षात घेता यंदा शाळेची पहिली घंटा उशिरा सुरू होण्याच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला असून यंदा २०२६-२७ या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!